उत्तर ध्रुवाभोवतीच्या बर्फाचे नुकसान आर्टिक हवामानामुळे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2017 12:51 AM2017-03-15T00:51:40+5:302017-03-15T00:51:40+5:30
उत्तर ध्रुवाभोवती असलेल्या बर्फाच्या समुद्राच्या अर्ध्या भागाचे झालेले नुकसान हे आर्टिकच्या हवामानातील नैसर्गिक बदलांमुळे आहे.
ओस्लो : उत्तर ध्रुवाभोवती असलेल्या बर्फाच्या समुद्राच्या अर्ध्या भागाचे झालेले नुकसान हे आर्टिकच्या हवामानातील नैसर्गिक बदलांमुळे आहे. उर्वरित नुकसान हे मानवनिर्मित ग्लोबल वॉर्मिंगमुळे असल्याचे शास्त्रज्ञांनी सोमवारी सांगितले.
या अभ्यासातून असे संकेत मिळत आहेत की आर्टिक महासागर हा येत्या काही वर्षांत बर्फमुक्त होण्याची भीती आहे. मानवनिर्मित ग्लोबल वॉर्मिंगने जो धोका दिसत आहे तो काहीसा पुढे ढकला जाऊ शकतो पण वारे त्यांच्या वातावरण थंड करण्याच्या भूमिका परत वठवणार असतील तरच. आर्टिक हवामानातील नैसर्गिक बदल हे १९७९ पासून सप्टेंबरमध्ये समुद्री बर्फात जी घट झाली तिला ३० ते ५० टक्के जबाबदार असू शकतील, असे अमेरिकास्थित शास्त्रज्ञांच्या तुकडीने नेचर क्लायमेट चेंज या पाक्षिकात लिहिले आहे. समुद्राच्या बर्फात सप्टेंबर २०१२ मध्ये विक्रमी म्हणता येईल अशी घट झाली होती. हा काळ आर्टिकमध्ये उशिराचा उन्हाळ््याच्या काळ असतो. १९७९ मध्ये उपग्रहांद्वारे ज्या नोंदी ठेवल्या गेल्या त्यावरून हा निष्कर्ष काढण्यात आलेला आहे. मार्चच्या मध्यात बर्फ खूपच कमी आहे. २०१६ व २०१५ मध्ये हिवाळा खूपच कमी होता.
या अभ्यासाने आर्टिकच्या वातावरणातील नैसर्गिक बदल व मानवनिर्मित बदल यांना वेगवेगळे केले. हा अभ्यास म्हणतो की आर्टिकच्या हवामानात दशकांपासून होणारे बदल हे ट्रॉपिकल पॅसिफिक ओशनमधील बदलांमुळेही असू शकतील. जर हा नैसर्गिक बदल नजीकच्या भविष्यात थांबवला तर आम्हाला गेल्या काही दिवसांत झपाट्याने जो बर्फ वितळत आहे तो थांबवता येईल एवढेच काय समुद्री बर्फ पुन्हा प्राप्त करता येईल, असे या अभ्यासाचे प्रमुख सांता बार्बारा येथील युनिव्हरसिटी आॅफ कॅलिफोर्नियाचे क्विंगहुआ डिंग यांनी म्हटले.