हवामान बदलामुळे गव्हाचे उत्पादन घटणार
By Admin | Published: February 21, 2015 02:45 AM2015-02-21T02:45:17+5:302015-02-21T02:45:17+5:30
हवानामातील बदलामुळे ऋतुमानात होणारे बदल वेळीच रोखण्यासाठी पावले उचलली गेली नाहीत, तर जगभरातील गव्हाचे उत्पादन आगामी दशकात एक चतुर्थांशाने कमी होण्याची शक्यता आहे,
वॉशिंग्टन : हवानामातील बदलामुळे ऋतुमानात होणारे बदल वेळीच रोखण्यासाठी पावले उचलली गेली नाहीत, तर जगभरातील गव्हाचे उत्पादन आगामी दशकात एक चतुर्थांशाने कमी होण्याची शक्यता आहे, असा इशारा कन्सास विद्यापीठातील आंतरराष्ट्रीय खाद्य विकास केंद्राचे संचालक वारा प्रसाद यांनी दिला आहे.
या केंद्रात संशोधन करणाऱ्या पथकात प्रसाद यांच्यासोबत इतरही संशोधक काम करतात. २०१२-१३ मध्ये जागतिक स्तरावर ७०.१ कोटी टन गव्हाचे उत्पादन झाले होते. त्या आधारावर प्रसाद आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी हा निष्कर्ष काढला आहे. तापमान वाढल्याने गव्हाचे उत्पादन ४.२ कोटी टनाने कमी होईल, असे त्यांचे म्हणणे आहे.