वादग्रस्त विधानामुळे ट्रम्प लोकप्रियतेच्या शिखरावर

By Admin | Published: December 11, 2015 11:29 PM2015-12-11T23:29:54+5:302015-12-11T23:29:54+5:30

देशात ९-११ सारखा दहशतवादी हल्ला कधीही होऊ शकतो या भीतीने अमेरिकनांना ग्रासले असून, त्यातूनच लोक डोनाल्ड ट्रम्प यांची बाजू घेत आहेत. गेल्या काही दिवसांत ते लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचले

Due to the controversial statement, Trump is at the peak of popularity | वादग्रस्त विधानामुळे ट्रम्प लोकप्रियतेच्या शिखरावर

वादग्रस्त विधानामुळे ट्रम्प लोकप्रियतेच्या शिखरावर

googlenewsNext

वॉशिंग्टन : देशात ९-११ सारखा दहशतवादी हल्ला कधीही होऊ शकतो या भीतीने अमेरिकनांना ग्रासले असून, त्यातूनच लोक डोनाल्ड ट्रम्प यांची बाजू घेत आहेत. गेल्या काही दिवसांत ते लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचले असून, त्यांच्या बाजूच्या रिपब्लिकनांच्या प्राथमिक मतांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. ही बाब न्यूयॉर्क टाइम्स व सीबीएस न्यूजच्या पाहणीतून समोर आली आहे.
इस्लामिक दहशतवाद्यांच्या अलीकडेच झालेल्या पॅरिस, सन बेर्नाडिनो, कॅलिफोर्निया हल्ल्यांमुळे दहशतवाद हा विषय लोकांच्या केंद्रस्थानी आला आहे. महिनाभरापूर्वी केवळ ४ टक्के लोक दहशतवाद हा आमचा प्रश्न आहे, असे म्हणत असत. मात्र, या हल्ल्यांनंतर यामध्ये १९ टक्के इतकी वाढ झाली आहे.
जनतेमध्ये चिंतेचे वातावरण असतानाच ट्रम्प यांच्या अलीकडच्या वादग्रस्त विधानाने त्यांना केंद्रस्थानी आणले आहे. देशातील मशिदींवर देखरेख हवी, असे मत ट्रम्प व्यक्त करीत असतानाच त्यांनी देशात मुस्लिमांना प्रवेशबंदी करावी, असे वादग्रस्त विधान करून खळबळ उडवून दिली. त्यांच्या या विधानाचा त्यांना पुरेपूर फायदा मिळताना दिसत आहे.

Web Title: Due to the controversial statement, Trump is at the peak of popularity

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.