वजन कमी करणे पडले महागात, पतीने दिला पत्नीला घटस्फोट

By Admin | Published: June 1, 2016 12:43 PM2016-06-01T12:43:03+5:302016-06-01T12:47:05+5:30

वजन कमी करण्याचे ऑपरेशन करून पतीला सरप्राइज देण्याचा प्रयत्न सौदी अरेबियातील महिलेच्या चांगलाच अंगाशी आला असून त्या ऑपरेशचा खर्च पाहून पतीने तिला घटस्फोटच देऊन टाकला.

Due to the loss of life, the husband gave his wife a divorce | वजन कमी करणे पडले महागात, पतीने दिला पत्नीला घटस्फोट

वजन कमी करणे पडले महागात, पतीने दिला पत्नीला घटस्फोट

googlenewsNext
style="text-align: justify;">ऑनलाइन लोकमत
रियाध, दि. ०१ - वजन कमी करण्याचे ऑपरेशन करून पतीला सरप्राइज देण्याचा प्रयत्न सौदी अरेबियातील महिलेच्या चांगलाच अंगाशी आला असून त्या ऑपरेशचा खर्च पाहून पतीने तिला घटस्फोटच देऊन टाकला. रियाधमध्ये राहणारी ही महिला शिक्षकी पेशातील असून तिच्या अतिलठ्ठपणामुळे तिचा पती नाराज होता. त्याने अनेकवेळा लठ्ठपणाबद्दल तक्रार करत तिच्याकडे  बारीक होण्याचा तगादा लावला होता. ही गोष्ट मनावर घेतलेल्या पत्नीने बारीक होण्याचा निर्धारच केला. पतीची दुस-या शहरात बदली झाल्यावर तिने एका डॉक्टरची भेट घेतली आणि वजन कमी करण्यासाठीचे ऑपरेशनही करून घेतले. मात्र या ऑपरेशनसाठी तब्बल २१ हजार डॉलर्सचा खर्च आला. 
 
बदलीच्या ठिकाणाहून घरी परतलेला पती आपल्या स्लिम-ट्रीम बायकोला पाहून भलताच खुश झाला. मात्र या ऑपरेशनसाठी झालेल्या खर्चाचा आकडा ऐकून तो संतापला. काबाडकष्ट करून साठवलेल्या या पैशांनी त्याला एक घर विकत घ्यायचे होते, मात्र पत्नीने ते पैसे ऑपरेशनवर उडवल्याने तो नाराज झाला आणि तिच्यापासून दूर राहू लागला. काही दिवसांनी त्यांच्यातील हा दुरावा वाढतच गेला आणि त्या पतीने पत्नीला सरळ घटस्फोट देण्याचा निर्णय घेतला. 
 
त्याच्या या निर्णयाबद्दल सोशल मीडियावर समजताच अनेकांनी नाराजी दर्शवत त्याची खिल्ली उडवली. पैसे खर्च केल्याच्या कारणामुळे पत्नीपासून फारकत घेण्याचा अधिकार नाही, असे सांगत अनेकांनी त्याच्यावर टीकाही केली. पैसे परत कमावत येऊ शकतात, पण पत्नीची जागा कोणीही घेऊ शकत नाही, असा सूर आळवत अनेकांनी त्याच्या निर्णयाबद्दल नाराजी व्यक्त केली. 

Web Title: Due to the loss of life, the husband gave his wife a divorce

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.