महिलांच्या चुकीच्या पेहरावामुळे नद्या पडतात कोरड्या ?
By admin | Published: June 13, 2016 07:00 PM2016-06-13T19:00:48+5:302016-06-13T19:00:48+5:30
दुष्काळामुळे आणि उन्हाच्या झळांमुळे नद्या आणि विहीर कोरड्या पडत असल्याचं माहिती असेल.
ऑनलाइन लोकमत
इराण, दि. 13 - दुष्काळामुळे आणि उन्हाच्या झळांमुळे नद्या आणि विहीर कोरड्या पडत असल्याचं माहिती असेल. मात्र इराणमधल्या मौलवींनी नद्या कोरड्या पडण्याचा नवा शोध लावला आहे.महिलांच्या चुकीच्या पेहरावामुळे इराणमधल्या निसर्गावर त्याचा परिमाण होत असून, नद्या कोरड्या पडत असल्याचं इस्लामिक रिपब्लिकच्या ज्येष्ठ मौलवी म्हणाले आहेत.
सय्यद युसूफ तबाताबी नेजद या मौलवींनी, महिलांच्या चुकीच्या पेहरावामुळे निसर्गावर विपरीत परिणाम होत असून, पोलिसांनी हे रोखण्यासाठी पावलं उचलण्याची गरज असल्याचं म्हटलं आहे. "माझ्या ऑफिसमध्ये महिलांच्या चुकीच्या पेहरावामुळे नद्या कोरड्या पडल्याचं चित्र प्राप्त झालं आहे. अशा प्रकारच्या कृत्यांमुळे नद्या कोरड्या पडत आहेत", असं मौलवी म्हणाले असल्याचं वृत्त आयएसएनए या न्यूज एजन्सीनं दिलं आहे.
दूरसंपर्क मंत्रालयानं हे सर्व प्रकार तातडीनं रोखले पाहिजेत. आवश्यकता भासल्यास या पापातून मुक्ती मिळवण्यासाठी पोलीस बळाचाही वापर करायला हवा, असा सल्लाही यावेळी मौलवी सय्यद युसूफ तबाताबी नेजद यांनी दिला आहे.