वाळुच्या वादळाने दुबई ठप्प
By admin | Published: April 3, 2015 12:00 AM2015-04-03T00:00:56+5:302015-04-03T00:00:56+5:30
संयुक्त अरब अमिरातीत घोंगावत असलेल्या वाळुच्या वादळाच्या तडाख्याने दुबईतील दोन आंतरराष्ट्रीय विमानतळांवरील हवाई वाहतूक पूर्णत:
दुबई : संयुक्त अरब अमिरातीत घोंगावत असलेल्या वाळुच्या वादळाच्या तडाख्याने दुबईतील दोन आंतरराष्ट्रीय विमानतळांवरील हवाई वाहतूक पूर्णत: कोलमडली असून दुबईला आकाश वाळवंटातील वाळूच्या वादळाने व्यापले आहे.
दुबई इंटरनॅशनल आणि अल-मकतौम इंटरनॅशनल एअरपोर्ट (डीडब्ल्यूसी) या वादळात गडप झाल्याने या दोन्ही विमानातळांवरील हवाई वाहतूक ठप्प झाली आहे. दक्षिण आशिया, इराण, बहरीन, कुवैत, ओमान, कतार, सौदी अरबियातून येणाऱ्या विमानांची दुबईला वर्दळ असते. या खराब हवामानाचा अबुधाबीला फटका बसला आहे. हेथ्रो विमानतळावर मात करीत जगातील सर्वांत वर्दळीचे विमानतळ असल्याचा लौकिक २०१४ मध्ये दुबई इंटरनॅशनल एअरपोर्टने मिळविला होता. दुबई विमानतळाकडे येणारी ४ विमाने नजीकच्या विमानतळाकडे वळविण्यात आली आहेत. दरम्यान, ८ विमाने डीडब्ल्यूसीकडे वळविण्यात आली आहेत. डीडब्ल्यूसी (दुबई वर्ल्ड सेंटर) हे दुबईतील दुसरे विमानतळ असून तेथे प्रामुख्याने मालवाहू विमानांची वर्दळ असते.
दम्माम, मस्कत, बहरीन, रास अल खैमाह आणि मुंबईहून अबुधाबी विमानतळावर येणारी विमाने एक तर खोळंबली आहेत किंवा ही उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. (वृत्तसंस्था)