लोकसंख्या कमी झाल्याने आता ‘करो या मरो’, 'या' देशानं दिला सक्त इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2023 07:00 AM2023-01-25T07:00:56+5:302023-01-25T07:01:26+5:30

कमी होत असलेली लोकसंख्या ही आता जपानची सर्वांत मोठी डोकेदुखी बनली आहे.

Due to decrease in population now do or die japan gave a strong warning | लोकसंख्या कमी झाल्याने आता ‘करो या मरो’, 'या' देशानं दिला सक्त इशारा

लोकसंख्या कमी झाल्याने आता ‘करो या मरो’, 'या' देशानं दिला सक्त इशारा

googlenewsNext

टोकियो :

कमी होत असलेली लोकसंख्या ही आता जपानची सर्वांत मोठी डोकेदुखी बनली आहे. जपानचे पंतप्रधान फुमिओ किशिदा यांनी घटत्या लोकसंख्येवर देशाला ‘करो किंवा मरो’ असा इशारा दिला आहे. यावरून परिस्थिती किती चिंताजनक असेल, याचा अंदाज लावता येतो.    

पंतप्रधानांनी खासदारांना सांगितले की, आता सरकार लोकसंख्या वाढीशी संबंधित सूचनांसाठी स्वतंत्र एजन्सी स्थापन करेल. सुमारे १२.५ कोटी लोकसंख्या असलेल्या जपानमध्ये गेल्या वर्षी आठ लाख मुले जन्माला आली. मात्र, ही संख्या कमी आहे. वृद्धांची संख्या वाढल्याने येथे कामगारांची संख्या कमी होत असून, अवलंबून असलेल्या लोकांची संख्या वाढत आहे.

आकडेवारीनुसार, जपानमधील ६५ पेक्षा अधिक वय असलेली लोकसंख्या २८ टक्क्यांवर पोहोचली असून, तो या जगात दुसऱ्या क्रमांकावर आहे. पहिल्या क्रमाकांवर मोनॅको  हा लहान लहान देश असून, येथे वृद्धांचे प्रमाण सर्वाधिक आहे.

Web Title: Due to decrease in population now do or die japan gave a strong warning

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Japanजपान