कोटा पद्धतीमुळे भारतीयांना ग्रीन कार्डची प्रदीर्घ प्रतीक्षा
By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2023 07:00 AM2023-05-21T07:00:47+5:302023-05-21T07:00:58+5:30
स्थलांतर कायद्यांतर्गत दरवर्षी १ लाख ४० हजार रोजगारावर आधारित ग्रीन कार्ड जारी केले जातात. तथापि, दरवर्षी यापैकी प्रत्येक देशाला सात आहे. टक्केच ग्रीन कार्ड मिळू शकतात.
लोकमत न्यूज नेटवर्क
वॉशिंग्टन ग्रीन कार्ड वाटपात : प्रत्येक देशासाठी ठरावीक कोटा असल्याने भारत, चीन, मेक्सिको व फिलिपाइन्समधील लोकांना ग्रीन कार्डसाठी दीर्घ प्रतीक्षा करावी लागत आहे. ही कोटा प्रणाली केवळ संसदेद्वारेच बदलली जाऊ शकते, असे एका वरिष्ठ अमेरिकन अधिकाऱ्याने सांगितले. ग्रीन कार्ड स्थलांतरितांना कायमस्वरूपी अमेरिकेत राहण्याची परवानगी देते.
स्थलांतर कायद्यांतर्गत दरवर्षी १ लाख ४० हजार रोजगारावर आधारित ग्रीन कार्ड जारी केले जातात. तथापि, दरवर्षी यापैकी प्रत्येक देशाला सात आहे. टक्केच ग्रीन कार्ड मिळू शकतात.
अमेरिकेत कायमस्वरूपी राहत असलेल्या एखाद्या व्यक्तीच्या कुटुंबातील सदस्यांना PASSPORT जारी करण्यात येणाऱ्या ग्रीन कार्डची वार्षिक मर्यादा जगासाठी २ लाख २६ हजार आहे. तर रोजगारावर आधारित ग्रीन कार्डची वार्षिक मर्यादा १ लाख ४० हजार आहे, असे अमेरिकी नागरिकत्व आणि स्थलांतर सेवेच्या संचालकांचे वरिष्ठ सल्लागार डग्लस रँड यांनी सांगितले.
ऑनलाइन कार्यक्रमात त्यांनी भारतीय अमेरिकींना सांगितले की, कुटुंबातील सदस्यांसाठी व रोजगारावर आधारित ग्रीन कार्डसाठी प्रत्येक देशासाठी सात टक्के वार्षिक कोटा आहे. त्यामुळेच भारत, चीन, मेक्सिको व फिलिपिन्समधील लोकांना इतरदेशांतील लोकांपेक्षा भारतीयांना जास्त वेळ थांबावे लागते, असे रैंड यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले.
केवळ अमेरिकी संसदच ही वार्षिक मर्यादा बदलू शकते. विशेष म्हणजे हजारो भारतीय व्यावसायिक एक दशकाहून अधिक काळ ग्रीन कार्डची वाट पाहत आहेत.