इफ्तार पार्टीवेळी सिरियामध्ये स्फोटकांनी भरलेली कार उडविली; 14 ठार

By ऑनलाइन लोकमत | Published: June 3, 2019 09:52 AM2019-06-03T09:52:05+5:302019-06-03T09:52:28+5:30

सिरियाने इस्त्रायलच्या ताब्यातील गोलन हाईट्समध्ये शनिवारी रात्री उशिरा दोन रॉकेट डागले होते.

During the Iftar party, a car filled with explosives in Syria; 14 killed | इफ्तार पार्टीवेळी सिरियामध्ये स्फोटकांनी भरलेली कार उडविली; 14 ठार

इफ्तार पार्टीवेळी सिरियामध्ये स्फोटकांनी भरलेली कार उडविली; 14 ठार

Next

दमिश्क : इफ्तार पार्टीवेळी सिरियामध्ये स्फोटकांनी भरलेली कार उडवून देण्यात आल्याने चार मुलांसमवेत 14 जण ठार झाले. तर 28 जण जखमी झाले आहेत. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. अजाज शहरातील एका मशिदीबाहेर हा दहशतवादी हल्ला करण्यात आला. 


अजाज शहर आजही तुर्की समर्थित सिरियाई विद्रोह्यांच्या ताब्यात आहे. अद्याप या हल्ल्याची जबाबदारी कोणीही घेतलेली नाही. 
रविवारी इस्त्रायलकडून झालेल्या रॉकेट हल्ल्यातही 10 जण ठार झाले होते. सिरियाने इस्त्रायलवर दोन रॉकेट डागले होते. यामुळे इस्त्रायलने प्रत्युत्तर दिले होते. या हल्ल्यात सिरियाचे 5 नागरिक आणि 5 सैनिक ठार झाले होते. 


सिरियाने इस्त्रायलच्या ताब्यातील गोलन हाईट्समध्ये शनिवारी रात्री उशिरा दोन रॉकेट डागले होते. यापैकी एक इस्त्रायलच्या सीमेवर पडले होते. यावर इस्त्रायलचे पंतप्रधान बेजामिन नेतन्याहू यांनी सांगितले की, आमच्या सीमेवर झालेला हल्ला खपवून घेतला जाणार नाही. आम्हीही या हल्ल्याचे जोरदार प्रत्यूत्तर देणार. 

Web Title: During the Iftar party, a car filled with explosives in Syria; 14 killed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Ramzanरमजान