डच जस्टीन ट्रडो जिंकणार?
By admin | Published: March 15, 2017 07:39 AM2017-03-15T07:39:46+5:302017-03-15T07:39:46+5:30
गीर्ट वाइल्डर्स यांनी स्थलांतरितांच्या विरोधात भूमिका घेतल्यामुळे त्यांना डच डोनल्ड ट्रम्प म्हटले जाते तर क्लावर यांना डच जस्टीन ट्रुडो असे म्हटले जाते.
ऑनलाइन लोकमत
हेग, दि 15 : कॅनडाचे पंतप्रधान जस्टीन ट्रुडो यांच्या देखणेपणामुळे ते जगभरात प्रसिद्ध झाले आहेत. टॅटू काढणारे, चित्रपटात काम करणारे आणि बॉक्सिंगची आवड असणाऱ्या ट्रुडो हे तरुणांमध्ये चांगलेच प्रसिद्ध आहेत. त्यांच्यासारखाच एक देखणा उमेदवार आता नेदरलँड्सच्या निवडणुकीत उभा राहिला आहे. त्यांचं नाव आहे जेसे क्लावर. डच संसदेसाठी बुधवारी मतदान होत आहे. या निवडणुकीमध्ये जेसे क्लावर आणि गीर्ट वाइल्डर्स, सध्याचे पंतप्रधान मार्क रुट, सायब्रँड वॅन हाएर्शमा ब्युमा या उमेदवारांमध्ये लढत होणार आहे. डच संसदेमध्ये १५० सदस्य निवडून येतात त्यापैकी ज्या पक्षास किंवा ज्या आघाडीस ७६ जागा मिळतील ते सत्ता स्थापन करु शकतात.
गीर्ट वाइल्डर्स यांनी स्थलांतरितांच्या विरोधात भूमिका घेतल्यामुळे त्यांना डच डोनल्ड ट्रम्प म्हटले जाते तर क्लावर यांना डच जस्टीन ट्रुडो असे म्हटले जाते.
क्लावर यांचा जन्म १ मे १९८६ रोजी झाला. त्यांचे वडिल मोरक्कन वंशाचे आणि आई इंडोनेशियन डच वंशाची आहे. २०१३ साली क्लावर विवाहबद्ध झाले असून त्यांना दोन मुलगेही आहेत. २०१५ पासून ग्रोएनलिंक्स पक्षाचे ते नेते आहेत. डच संसदेच्या विविध समित्यांवर क्लावर यांनी काम केलेले आहे. वयाच्या तिसाव्या वर्षीच ही महत्वाची निवडणूक ते लढवत असल्यामुळे सगळ््या जगाचे लक्ष डच मतदार कोणाला कौल देतात याकडे लागले आहे.