Pakistan Economic Crisis : कंगाल पाकिस्तान मोठा निर्णय घेणार! अर्थव्यवस्थेला वाचवण्यासाठी नोटबंदी करणार
By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2023 01:26 PM2023-04-29T13:26:28+5:302023-04-29T13:30:46+5:30
Pakistan Economic Crisis : अर्थव्यवस्था वाचवण्याचे पाकिस्तानच्या नेत्यांचे सर्व प्रयत्न फोल ठरताना दिसत आहेत.
Pakistan Economic Crisis : गेल्या काही महिन्यांपासून पाकिस्तान आर्थिक संकटात सापडला आहे. महागाई मोठ्या प्रमाणात वाढली आहे. पाकिस्तान एक कर्ज फेडण्यासाठी दुसरे कर्ज घेत आहेत. सध्याच्या आर्थिक संकटातून बाहेर पडण्यासाठी पाकिस्तानने आपल्या ५,००० रुपयांच्या नोटा चलनात आणणे तात्काळ थांबवावे, असा सल्ला अर्थतज्ज्ञ अम्मार खान यांनी दिला आहे. पाकिस्तानातील सर्वोच्च मूल्याची चलनी नोट आहे. मात्र, याआधी शेजारील देशात नोटाबंदीची मागणी होत असताना पाकिस्तान सरकारने ती फेटाळून लावली होती.
खानच्या व्हायरल पॉडकास्टमध्ये, त्यांनी म्हटले आहे की, या सूत्राने भारतात खूप काम केले आणि या पाऊलामुळे कर संकलनात मोठी वाढ झाली. विशेष म्हणजे नोव्हेंबर २०१६ मध्ये भारताने ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा चलनातून बाद केल्या आहेत.
या ५००० रुपयांच्या नोटांचा काही उपयोग नाही, असा युक्तिवाद पाकिस्तानी अर्थतज्ज्ञाने केला. देशातील बँकांमध्ये रोकड नाही, त्या लोकांना कर्ज देऊ शकत नाहीत. अशा स्थितीत चलनात ५००० रुपयांच्या रूपात असलेले ८ लाख कोटी रुपये देशाच्या बँकेत परत आले, तर अचानक अतिरिक्त पैसा उपलब्ध होईल. जे काही प्रमाणात आर्थिक संकटावर मात करण्यास मदत करेल.
अम्मार खान पुढे म्हणाले की, 'पाकिस्तानमध्ये ५,००० रुपयांच्या नोटा बंद करण्यास विरोध असेल, पण ही सर्वात मोठी नोट फक्त बड्या लोकांकडे आणि काही व्यावसायिकांकडे असेल.