शोधमोहिमेतील पाणबुड्याचा मृत्यू
By admin | Published: May 6, 2014 07:09 PM2014-05-06T19:09:25+5:302014-05-07T02:24:28+5:30
गेल्या महिन्यात झालेल्या जहाज अपघातातील बेपत्ता प्रवाशांच्या शोधासाठी राबवल्या जात असलेल्या मोहिमेतील एका पाणबुड्याचा मृत्यू झाला.
सेऊल : गेल्या महिन्यात झालेल्या जहाज अपघातातील बेपत्ता प्रवाशांच्या शोधासाठी राबवल्या जात असलेल्या मोहिमेतील एका पाणबुड्याचा मृत्यू झाला. आपल्या नियत ठिकाणासाठी रवाना झालेल्या या पाणबुड्याचा पाच मिनिटानंतर संपर्क तुटला, अशी माहिती दक्षिण कोरियाच्या आपत्ती व्यवस्थापन पथकाच्या प्रवक्त्याने दिली.
समुद्रातून वर आल्यानंतर त्याला श्वास घेता येत नव्हता, यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. रुग्णालयात डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. मृत व्यक्ती हा एका खासगी कंपनीचा कर्मचारी आहे. गेल्या १६ एप्रिल रोजी दक्षिण कोरियाच्या दक्षिणेकडील समुद्र किनार्यावर सेवोल नामक जहाज बुडाले होते. यात ४७६ प्रवासी होते. यापैकी १७४ प्रवाशांना वाचवण्यात आतापर्यंत यश आले आहे. २६३ जण मृत पावले, तर अद्याप ३९ जण बेपत्ता आहेत. (वृत्तसंस्था)