अवकाशात सापडला पृथ्वीच्या आकाराचा हिरा
By admin | Published: June 26, 2014 01:36 AM2014-06-26T01:36:10+5:302014-06-26T14:51:58+5:30
अंतराळवीरांच्या एका पथकाला अत्यंत थंड व फिक्या प्रकाशाचा पांढरा अस्तंगत होणारा तारा दिसला
Next
>वॉशिंग्टन : अंतराळवीरांच्या एका पथकाला अत्यंत थंड व फिक्या प्रकाशाचा पांढरा अस्तंगत होणारा तारा दिसला असून, या ता:यामधील कार्बन कण इतके थंड झाले आहेत की, त्याचे स्फटिक तयार झाले असून, त्यामुळे अवकाशात या ता:याच्या रूपाने झगमगता हिरा झळकतो आहे.
या ता:याचे वय आपल्या मिल्की वे या आकाशगंगेइतके असावे. म्हणजेच हा तारा 11 अब्ज वर्षाचा आहे. अवकाशात दिसणारे त्याचे रूप हे एक अगदी दुर्मिळ असे दृश्य आहे, असे अमेरिकेतील विस्कॉन्सिन- मिलाऊके विद्यापीठातील प्राध्यापक डेव्हिड काप्लान यांनी म्हटले आहे. काप्लान व त्यांच्या सहका:यांनी नॅशनल रेडिओ अॅस्ट्रॉनॉमी प्रयोगशाळेची ग्रीन बँक दुर्बिण व बेसलाईन अॅरे ही लांब दुर्बिण तसेच इतर दुर्बिणींचा वापर करून हा तारा पाहिला आहे. पांढरे ड्वार्फ तारे अत्यंत घन स्वरूपात असतात व नष्ट होण्याच्या मार्गावर असतात.
कार्बन व ऑक्सिजन हे दोनच मुख्य घटक असणारे हे तारे नष्ट होण्यास अब्जावधी वर्षे लागतात. हा तारा अत्यंत थंड असणार असे संशोधकांचे मत असून, हा पांढरा ड्वार्फ तारा 2,7क्क् अंश सेल्सिअस इतका थंड असू शकतो. या ता:यावरील कार्बनचे अणू हि:याप्रमाणोच स्फटिकासारखे झालेले आहेत. (वृत्तसंस्था)