भूकंपाने विमानतळाचा एटीसी टॉवर कोसळला; सॅटेलाईट फोटो आला समोर, अनेक विमानांचे उड्डाण रद्द
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2025 22:14 IST2025-03-29T22:12:21+5:302025-03-29T22:14:52+5:30
शुक्रवारी म्यानमारमध्ये झालेल्या विनाशकारी भूकंपात १००० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. या आपत्तीत २३०० हून अधिक लोक जखमी झाले आहेत.

भूकंपाने विमानतळाचा एटीसी टॉवर कोसळला; सॅटेलाईट फोटो आला समोर, अनेक विमानांचे उड्डाण रद्द
म्यानमारमध्ये शुक्रवारी मोठा भूकंप झाला. या भूकंपामुळे मोठे नुकसान झाले. रस्त्यांवर फक्त कचरा दिसतोय. भूकंपानंतरच्या विध्वंसाचे दृश्य पाहून लोक घाबरत आहेत. या आपत्तीत १००० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे आणि २३०० हून अधिक लोक जखमी झाल्याची माहिती आहे.
भूकंपानंतर देशभरात मोठ्या प्रमाणात विध्वंस झाला आहे.
दरम्यान, सध्या सोशल मीडियावर एक सॅटेलाईट फोटो व्हायरल झाला आहे. यामध्ये शुक्रवारी झालेल्या भूकंपामुळे नेपच्यून आंतरराष्ट्रीय विमानतळाचा हवाई वाहतूक नियंत्रण टॉवर कोसळल्याचे दिसून येते.
म्यानमारसाठी भारत बनला संकटमोचक! आग्र्याहून फील्ड हॉस्पिटल पाठवणार;ऑपरेशन ब्रह्मा सुरू
समोर आलेल्या सॅटेलाईट फोटोवरून टॉवर अशा प्रकारे पडला जणू काही तो त्याच्या पायथ्यापासून उखडला आहे, असं दिसत आहे. टॉवरवर कचरा विखुरलेला दिसतो. या टॉवरवरून म्यानमारच्या राजधानीतील सर्व हवाई वाहतूक नियंत्रित केली जात होती. आता हा टॉवर कोसळला असल्यामुळे याचा परिणाम उड्डाणांवर झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हा टॉवर कोसळल्याने कोणी जखमी झाल्याची माहिती समोर आलेली नाही. भूकंप झाला तेव्हा कामगार या टॉवरमध्ये होते अशी माहिती समोर आली आहे.
चीनमधून बचाव पथकांना घेऊन जाणारी विमाने थेट प्रभावित प्रमुख शहर मंडाले आणि नायपितावच्या विमानतळांवर जाण्याऐवजी यांगून विमानतळावर उतरली आहेत. नेप्टो विमानतळावरील विमानांचे ऑपरेशन थांबवण्यात आले आहे.
आतापर्यंत १००० हून अधिक लोकांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, भूकंपामुळे म्यानमारमध्ये १००० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. लष्कराच्या नेतृत्वाखालील सरकारच्या मते, आतापर्यंत १,००२ लोक मृत आढळले आहेत आणि २,३७६ जण जखमी आहेत. या आपत्तीतील मृतांचा आकडा वाढू शकतो, असे सरकारी निवेदनात म्हटले आहे.
भूकंपाचा केंद्रबिंदू कुठे?
शुक्रवारी म्यानमारमध्ये झालेल्या भूकंपाचे केंद्र मंडालेजवळ होते. यामुळे बँकॉक, थायलंड आणि म्यानमारमध्ये जोरदार भूकंपाचे धक्के जाणवले. भूकंपामुळे म्यानमारमध्ये मोठे नुकसान झाले आहे. यामुळे येथील अनेक इमारती कोसळल्या.