टर्की आणि ग्रीसला भूकंपाचा धक्का, 2 ठार, 200 जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2017 07:50 AM2017-07-21T07:50:40+5:302017-07-21T10:16:46+5:30

टर्की आणि ग्रीकला शुक्रवारी पहाटेच्या सुमारास 6.7 रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाचा धक्का बसला.

An earthquake hits Turkey and Greece, 2 killed and 200 injured | टर्की आणि ग्रीसला भूकंपाचा धक्का, 2 ठार, 200 जखमी

टर्की आणि ग्रीसला भूकंपाचा धक्का, 2 ठार, 200 जखमी

Next

 ऑनलाइन लोकमत 

लंडन, दि. 21 - टर्की आणि ग्रीकला शुक्रवारी पहाटेच्या सुमारास 6.7 रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाचा धक्का बसला. या भूकंपामध्ये ग्रीकच्या केओएस बेटावर दोघांचा मृत्यू झाला आहे. 200 पेक्षा अधिक जण जखमी झाले असून, केओएसला भूकंपाचा सर्वाधिक फटका बसल्याचे अधिका-यांनी सांगितले. केओएसमध्ये 120 तर, टर्कीमध्ये 70 जण जखमी झाले.
 
अमेरिकेच्या भूगर्भशास्त्र विभागाने दिलेल्या माहितीनुसार टर्कीच्या बोडरम रिसॉर्टपासून 10 किमी आणि ग्रीकच्या केओएस बेटापासून 16 किमीवर भूकंपाचा केंद्रबिंदू  आहे. भूकंपात दोन जण ठार झाले तर, अनेक जण जखमी झाले अशी माहिती केओएसचे महापौर जॉर्ज यांनी दिली. काही इमारती आणि घरांची पडझड झाली आहे. दुर्घटनास्थळावर युद्धस्तरावर मदत आणि बचावकार्य सुरु आहे. 
 
काल जपानचं फुकुशिमा शहर आज सकाळी भूकंपाच्या धक्क्याने हादरलं. 5.8 रिश्टर स्केल इतकी भूकंपाची तीव्रता होती. भूकंपामुळे कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाल्याचं वृत्त नाही तसंच त्सुनामीचा धोका नसल्याचंही स्पष्ट करण्यात आलं .  जपानचं फुकुशिमा शहर 5.8 रिश्टर स्केल इतकी भूकंपाची तीव्रता होती. भूकंपामुळे कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाल्याचं वृत्त नाही तसंच त्सुनामीचा धोका नसल्याचंही स्पष्ट करण्यात आलं.  

आणखी वाचा 
जपानला बसला भूकंपाचा धक्का
स्वसंरक्षणासाठी भारत पूर्णपणे सज्ज - सुषमा स्वराज
अणू चाचणी टाळण्यासाठी अमेरिकेने पाकिस्तानला दिली होती 5 अब्ज डॉलर्सची ऑफर
 
दोन दिवसांपूर्वी रशियालाही भूकंपाचा तीव्र धक्का बसला होता. रशियामधील कमचटका पेनिसुला येथे शक्तिशाली भूकंप झाला होता. आग्नेय (दक्षिण पूर्व) समुद्र किनाऱ्यावर 7.7 रिश्टर स्केलच्या भूकंपाचे धक्के जाणवले. भूकंपाचा केंद्रबिंदू बर्निंग आयलँडपासून 200 किलोमीटर लांब होता. या भूकंपानंतर त्सुनामी येण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती तसंच अलर्टही जारी करण्यात आला होता.  
 
मंगळवारी सकाळी 11 वाजून 34 मिनिटांनी  निकोल्सकोय शहरापासून जवळपास 200 किमी दूर अंतरावर असलेल्या कमचटका पेनिसुला आयर्लॅडवर भूकंप आला होता. भूकंपाची व्याप्ती खूप कमी होती. हा भूकंप प्रचंड धोकादायक होता. मात्र भूकंप शहरापासून लांब झाला, तसंच याठिकाणी कोणतीही मानवी वस्ती नसल्याने सुदैवाने कोणत्याही प्रकारचं नुकसान झालं नव्हतं.
 

Web Title: An earthquake hits Turkey and Greece, 2 killed and 200 injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.