तुर्की-सिरियामध्ये आलेला भूकंप अमेरिकेचं कारस्थान? HAARPचा हात असल्याचा दावा, चर्चांना उधाण
By ऑनलाइन लोकमत | Published: February 11, 2023 10:17 AM2023-02-11T10:17:17+5:302023-02-11T10:18:34+5:30
Earthquake in Turkey-Syria : तुर्की आणि सिरियामध्ये आलेल्या प्रलयंकारी भूकंपाने हजारो बळी गेले आहेत. मात्र या संकटादरम्यान करण्यात येत असलेल्या एका दाव्यामुळे मोठा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
तुर्की आणि सिरियामध्ये आलेल्या प्रलयंकारी भूकंपाने हजारो बळी गेले आहेत. मात्र या संकटादरम्यान करण्यात येत असलेल्या एका दाव्यामुळे मोठा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. अमेरिकेच्या कटकारस्थानामुळे हा भूकंप आल्याचा दावा सोशल मीडियावरून करण्यात येत आहे. अमेरिकेने आपल्या वेदर टेकनिकचा वापर करून तुर्कीमध्ये विध्वंस घडवल्याचा दावा केला जात आहेत. या भूकंपामागे HAARP (हाय फ्रिक्वेंसी अॅक्टिव्ह एरोरल रिसर्च प्रोग्रॅम) चा हात आहे, असा आरोप केला जात आहे. सोशल मीडियावर याबाबत अनेक व्हिडीओ शेअर केले जात आहेत.
यातील एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. त्यामध्ये भूकंपादरम्यान, वीज पडताना दिसत आहे. आता दावा केला जात आहे की, भूकंपादरम्यान, वीज पडणे ही सामान्य बाब नाही आहे. अमेरिकेने आर्टिफिशियल पद्धतीने असे केले. तुर्कीने पाश्चात्य देशांनी सांगितलेल्या मार्गावरून जाण्यास नकार दिल्याने त्याला आता शिक्षा दिली जात आहे, अशा प्रकारचे आरोप अनेक सोशल मीडिया अकाऊंटवरून केला जात आहे.
HAARP ही अलास्का येथे असलेली अमेरिकेची संस्था आहे. येथे रेडियो ट्रान्समीटरच्या मदतीने वातावरणाचा अभ्यास केला जातो. सन २०२२ मध्ये याने हमावामाबाबतचे महत्त्वाचे अपडेट दिले होते. मात्र यामध्ये भूकंप आणण्याची क्षमता असल्याचा दावा कधीही केला गेलेला नाही. मात्र आधीही नैसर्गिक आपत्तींसाठी HAARP वर सवाल उपस्थित केले गेले आहेत. अनेक देश भूकंप आणि त्सुनामीसारख्या संकटांसाठी HAARP ला दोषी मानतात.
अनेक देश हवामानावर नियंत्रण मिळवून दुसऱ्या देशांवर हल्ला करू शकतात. त्याला वेदर वॉरफेअर म्हटलं जातं. या युद्धामध्ये हत्यारांचा वापर होणार नाही. तर निसर्गाला अंकित करून हल्ला केला जाईल. अगदी भूकंप किंवा त्सुनामी आणला जाईल. मीडिया रिपोर्ट्सनुसार आधीही हार्पवर संशय घेण्यात आलेला आहे. २०१० मध्ये पाकिस्तानमध्ये महापूर आला होता. मात्र आतापर्यंत शास्त्रज्ञांनी दुजोरा दिलेला नाही.