भूकंपाने अफगाणिस्तान हादरला, इमारती कोसळल्या; २००० जणांचा मृत्यू, अनेकजण जखमी

By ऑनलाइन लोकमत | Published: October 8, 2023 12:03 PM2023-10-08T12:03:17+5:302023-10-08T12:09:53+5:30

अनेक इमारतींचे नुकसान झाले असून लोक अजूनही ढिगाऱ्याखाली अडकले आहेत.

Earthquake Shakes Afghanistan; 2000 people died, buildings collapsed | भूकंपाने अफगाणिस्तान हादरला, इमारती कोसळल्या; २००० जणांचा मृत्यू, अनेकजण जखमी

भूकंपाने अफगाणिस्तान हादरला, इमारती कोसळल्या; २००० जणांचा मृत्यू, अनेकजण जखमी

googlenewsNext

अफगाणिस्तानमध्ये पुन्हा एकदा भूकंपाने मोठा हाहाकार माजवला आहे. अफगाणिस्तानच्या पश्चिमेला झालेल्या शक्तिशाली भूकंपात सुमारे २००० लोक ठार झाले आहेत. पश्चिम अफगाणिस्तानमधील इराण सीमेजवळ झालेल्या या शक्तिशाली भूकंपानंतर मोठ्या प्रमाणात लोक जखमीही झाले आहेत. भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर ६.३ इतकी मोजण्यात आली आहे. शोध आणि बचावकार्य सुरु असून मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

भूकंपामुळे हेरात शहरापासून सुमारे ४० किमी (२५ मैल) दूर असलेली अनेक गावे उद्ध्वस्त झाली. अनेक इमारतींचे नुकसान झाले असून लोक अजूनही ढिगाऱ्याखाली अडकले आहेत. किमान तीन शक्तिशाली हादरे लोकांना जाणवले. वाचलेल्यांनी भयानक दृश्यांचे वर्णन केले, कारण कार्यालयाच्या इमारती प्रथम हादरल्या आणि नंतर त्यांच्याभोवती कोसळल्या. 

युनायटेड स्टेट्स जिओलॉजिकल सर्व्हेने नोंदवले की भूकंपाचा केंद्रबिंदू हेरात शहराच्या वायव्येस सुमारे ४० किलोमीटर अंतरावर होता. यानंतर तीन जोरदार आफ्टरशॉक आले, ज्यांची तीव्रता ६.३, ५.९ आणि ५.५ होती. देशाच्या माहिती आणि संस्कृती मंत्रालयाचे प्रवक्ते अब्दुल वाहिद रायन यांनी सांगितले की, हेरातमधील भूकंपातील मृतांची संख्या मूळ अहवालापेक्षा जास्त आहे. तात्काळ मदतीचे आवाहन करताना ते म्हणाले, जवळपास सहा गावे उद्ध्वस्त झाली असून शेकडो नागरिक ढिगाऱ्याखाली अडकले आहेत. एका अपडेटमध्ये ४६५ घरे उद्ध्वस्त झाली आहेत आणि १३५ इतरांचे नुकसान झाले आहे.

Web Title: Earthquake Shakes Afghanistan; 2000 people died, buildings collapsed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.