इबोला
By admin | Published: August 28, 2014 08:55 PM2014-08-28T20:55:42+5:302014-08-28T20:55:42+5:30
तीन पश्चिम आफ्रिकन देशांसाठीची विमानसेवा बंद
Next
त न पश्चिम आफ्रिकन देशांसाठीची विमानसेवा बंद--------------इबोलाची दहशत : संयुक्त राष्ट्रसंघाची मात्र निर्णयावर टीकाफ्रीटाऊन : इबोलाच्या दहशतीमुळे आणखी काही विमान कंपन्यांनी या साथीच्या केंद्रस्थानी असलेल्या तीन पश्चिम आफ्रिकन देशांसाठीची विमान उड्डाणे थांबविली आहेत. परिणामी हे देश अधिक एकाकी पडले आहेत. सिएरा लिओनसाठीची विमान उड्डाणे तात्पुरती थांबवावीत ही फ्रान्स सरकारची विनंती एअर फ्रान्सने मान्य केली आहे. त्यामुळे सिएरा लिओनची राजधानी फ्रीटाऊन व शेजारील लायबेरियाच्या मोन्रोव्हाया येथे आता रॉयल एअर मोरोक्कोचे केवळ एकच नियमित उड्डाण उरले आहे. ब्रिटिश एअरवेजने इबोला साथीच्या भीतीमुळे सिएरा लिओन व लायबेरियासाठीची आपली उड्डाणे पुढील वर्षापर्यंत रद्द केल्याच्या दुसर्याच दिवशी एअर फ्रान्सनेही या देशांपासून स्वत:ला वेगळे केले. ब्रुसेल्स एअरलाईन्सची लायबेरिया, सिएरा लिओनसाठी चार, तर गिनीसाठी तीन उड्डाणे होती. मात्र, यातीलही अनेक उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. शनिवारी आपण पुढील वेळापत्रक निश्चित करणार असल्याचे या कंपनीने म्हटले आहे. प्रवाशांच्या मागणीवरून या कंपनीने इबोलाग्रस्त देशांसाठी तीन स्वतंत्र उड्डाणे करण्याचे मान्य केले आहे. या विमानांद्वारे संयुक्त राष्ट्रसंघाचे ४० टन वैद्यकीय साहित्यही नेण्यात येणार आहे. इबोलाग्रस्त देशांसाठीची विमान उड्डाणे रद्द करणार्या विमान कंपन्यांवर संयुक्त राष्ट्रसंघाचे इबोलावरील दूत डेव्हिड नाबारो यांनी टीका केली होती. हे देश अधिक एकाकी पडत चालल्यामुळे संयुक्त राष्ट्रसंघाला काम करणे कठीण बनले असल्याचे ते म्हणाले. दरम्यान, इबोला साथीवर चर्चेसाठी हा विषाणू धुमाकूळ घालत असलेल्या देशातील आरोग्यमंत्र्यांची घानाच्या राजधानीत गुरुवारी बैठक होत आहे. इबोलाग्रस्त देशांचे प्रशासन इतिहासातील या सर्वात घातक साथीला रोखण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करत आहे. या वर्षाच्या सुरुवातीला उद्रेक झाल्यापासून इबोला विषाणूने आतापर्यंत १, ४२७ नागरिकांचा बळी घेतला आहे. २,६०० नागरिकांना याची बाधा झाली असून लायबेरियाला सर्वाधिक तडाखा बसला आहे. या देशात इबोलाने ६२४ जणांचा बळी घेतला. गिनीत ४०६ तर सिएरा लिओनमध्ये ३९२ जणांना प्राण गमवावे लागले आहेत.