लिबेरियात पुन्हा इबोला, एकाचा मृत्यू
By admin | Published: November 24, 2015 04:39 PM2015-11-24T16:39:53+5:302015-11-24T16:48:25+5:30
गेल्या वर्षी लिबेरियात थैमान घालणा-या इबोला या विषाणू रोगाचा प्रादुर्भाव पुन्हा दिसून आला आहे. येथील एका १५ वर्षीय मुलाचा इबोलामुळे मृत्यू झाल्याचे समोर आले आहे.
Next
>ऑनलाइन लोकमत
मोनरोविया, दि. २४ - गेल्या वर्षी लिबेरियात थैमान घालणा-या इबोला या विषाणू रोगाचा प्रादुर्भाव पुन्हा दिसून आला आहे. येथील एका १५ वर्षीय मुलाचा इबोलामुळे मृत्यू झाल्याचे समोर आले आहे.
नॅथन ग्बोटो असे या मृत मुलाचे नाव असून त्याला ताप आल्याने गेल्या आठवड्यात रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. यावेळी त्याची तपासणी केल्यानंतर त्याला इबोलाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर काल त्याचा मृत्यू झाला. दरम्यान, नॅथन ग्बोटोला इबोलाची लागण झाल्याचे कळल्यानंतर त्याचे वडील आणि भाऊ यांच्यावरही येथील रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
गेल्या सप्टेंबर महिन्यात लिबेरिया इबोला मुक्त झाल्याची घोषणा करण्यात आली होती. त्यानंतर आता या घटनेनंतर पुन्हा इबोलाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.