इबोलाने 4,000 जणांचा मृत्यू

By admin | Published: October 12, 2014 02:17 AM2014-10-12T02:17:09+5:302014-10-12T02:17:09+5:30

इबोलाच्या साथीने आतार्पयत 4 हजार जणांचा बळी घेतला असून या जीवघेण्या साथीचा इतरत्र प्रादुर्भाव होऊ नये म्हणून जगभर कसोशीने प्रयत्न केले जात आहेत.

Ebola killed 4,000 people | इबोलाने 4,000 जणांचा मृत्यू

इबोलाने 4,000 जणांचा मृत्यू

Next
>माद्रिद : इबोलाच्या साथीने आतार्पयत 4 हजार जणांचा बळी घेतला असून या जीवघेण्या साथीचा इतरत्र प्रादुर्भाव होऊ नये म्हणून जगभर कसोशीने प्रयत्न केले जात आहेत. पश्चिम आफ्रिकेत या साथीने कहर केला असून याच भागात मोठय़ा संख्येने लोक मरण पावले आहेत. याशिवाय ऑस्ट्रेलिया ते ङिाम्बाब्वे, मॅसिडोना ते स्पेनर्पयत या साथीचा फैलाव झाला असून अनेक जण तापाने फणफणत आहेत. तसेच इबोला या घातक विषाणूंची बाधा झालेल्या अनेकांना इतरांपासून स्वतंत्र ठेवण्यात (संसर्गरोधी कक्ष) आले आहे.
जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीनुसार या घातक साथीने 8 ऑक्टोबर्पयत 4,क्33 जणांचा मृत्यू झाला आहे. इबोलाचा वाढता प्रादुर्भाव पाहता संयुक्त राष्ट्राने आर्थिक मदतीचे आवाहन केले असले तरी या साथीचा मुकाबला करण्यासाठी आणखी आर्थिक मदतीची गरज आहे. जवळपास 1 अब्ज डॉलरची अजून गरज आहे.
माद्रिद येथील एका नर्सला इबोला विषाणूंची लागण झाली असून तिचा मृत्यूशी संघर्ष चालू आहे. ही साथ आटोक्यात आणण्यासाठी आर्थिक मदतीसोबत वैद्यकीय पथकांचीही मदत जरूरी आहे.
 संयुक्त राष्ट्राचे उप-सरचिटणीस ज्ॉन इलियासन यांनी डॉक्टर्स, नर्सेस आणि आरोग्य क्षेत्रतील कर्मचा:यांना   तसेच समाजसेवी संघटनेच्या कार्यकत्र्याना या साथीचा मुकाबला करण्यासाठी पुढे येण्याचे आवाहन केले आहे. गुरुवारी संयुक्त राष्ट्राचे सरचिटणीस बान-की-मून यांनीही हा लढा आणखी वीसपटीने वाढविण्याचे आवाहन केले होते. 
लायबेरियात इबोलाने 2,316 जण मृत्यू पावले आहेत. मॅसिडोनियातील जे लोक इबोलाग्रस्त ब्रिटिश व्यक्तीच्या संपर्कात आले होते, त्या लोकांना संसर्गरोधी कक्षात ठेवण्यात आले आहे.  (वृत्तसंस्था)
 
च्ही साथ आटोक्यात आणण्यासाठी र्सवकष प्रयत्न न केल्यास जानेवारीर्पयत मृतांचा आकडा लाखावर जाऊ शकतो, असा इशारा अमेरिकेच्या रोग नियंत्रण आणि प्रतिबंध केंद्राने दिला आहे. दरम्यान, भारताने इबोलावरील लस शोधण्यासाठी आंतरराष्ट्रीय समुदायाला सहकार्य करण्यास बांधील असल्याचे स्पष्ट केले आहे. यासाठी जागतिक पातळीवर केल्या जात असलेल्या कामासाठी मदत करण्याची ग्वाहीही भारताने दिली आहे. 

Web Title: Ebola killed 4,000 people

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.