इबोलाचा जगात हाहाकार; अमेरिकेत दहशत
By admin | Published: October 17, 2014 11:54 PM2014-10-17T23:54:32+5:302014-10-17T23:54:32+5:30
इबोला या घातक आजाराने जगात हाहाकार माजवला असून चार हजाराहून अधिक बळी घेतले आहेत.
Next
वॉशिंग्टन : इबोला या घातक आजाराने जगात हाहाकार माजवला असून चार हजाराहून अधिक बळी घेतले आहेत. कोणतीही लस अथवा औषध उपलब्ध नसल्याने या विषाणूची सध्या प्रचंड दहशत निर्माण झाली आहे. इबोलाचा संसर्ग झालेल्या टेक्सासमधील परिचारिकेला पुढील उपचारासाठी गुरुवारी वॉशिंग्टनजवळील नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ हेल्थ (एनआयएच) येथे हलविण्यात आले आहे. देशाची सर्वोच्च वैद्यकीय सुविधा म्हणून एनआयएचकडे पाहिले जाते. टेक्सासमध्ये इबोला रुग्णावर उपचार करताना निना फाम (26) हिला संसर्ग झाला होता. निनावर एनआयएचमध्ये अत्याधुनिक उपचार करण्यात येतील, असे नॅशनल इन्स्टिटय़ूट फॉर अलर्जी अॅण्ड इन्फेक्शिअस डिसिजचे प्रमुख अॅन्थोनी फौसी यांनी सांगितले. टेक्सास प्रेस्बायटेरियन हॉस्पिटल डलासमध्ये कार्यरत निना लायबेरियन इबोला रुग्ण थॉमस एरिक डन्कन याच्यावर उपचार करणा:या वैद्यकीय पथकात सहभागी होती. डन्कन यांचा आठ ऑक्टोबर रोजी मृत्यू झाला. त्यानंतर काही दिवसांनी निना यांना इबोलाचा संसर्ग झाल्याचे आढळून आले. तेव्हापासून त्यांच्यावर संसर्गरोधी कक्षात उपचार सुरू आहेत. निना यांच्यापाठोपाठ त्यांच्या सहकारी अॅम्बर व्हिन्सन यांनाही इबोलाची बाधा झाल्याचे गेल्या बुधवारी आढळून आले.
अॅम्बर यांच्यावर अटलांटा येथील इमोरी युनिव्हर्सिटी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. डन्कन यांच्यावर उपचार केलेल्या रुग्णालयातील 7क् आरोग्य कर्मचा:यांवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे. यापैकी कोणतीही इबोलाची लक्षणो आढळून आल्यास त्याला तातडीने संसर्गरोधी कक्षात हलविण्यात येणार आहे. अमेरिकी प्रशासनाने आणखी काही रुग्ण पुढे येऊ शकतात, असा इशारा दिला आहे. (वृत्तसंस्था)