इबोलाचा वाढता प्रादुर्भाव घातक
By admin | Published: November 6, 2014 03:12 AM2014-11-06T03:12:42+5:302014-11-06T03:12:42+5:30
इबोलाचा फैलाव वाढण्यासह ही साथ आणखी घातक ठरू शकते, असा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे.
न्यूयॉर्क : इबोलाचा फैलाव वाढण्यासह ही साथ आणखी घातक ठरू शकते, असा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे.
मे महिन्यात पश्चिम आफ्रिकेपासून या साथीचा प्रादुर्भाव झाल्यापासून इबोलाने आतापर्यंत ५ हजार लोकांना बळी घेतला आहे. या इबोलामुळे होणाऱ्या मृत्यूचा दर ७० टक्क्यांपेक्षा जास्त असल्याचे अमेरिकेतील राईट स्टेक विद्यापीठाने सर्वेक्षणात म्हटले आहे. इबोलाची साथ आटोक्यात आणण्यासाठी जागतिकस्तरावर प्रयत्न होत असले तरी ते पुरेसे नाहीत, याकडेही या सर्वेक्षणात नमूद करण्यात आले आहे. जागतिक आरोग्याने मृत्यूचे प्रमाण ५० टक्के असल्याचा दावा केला होता. तथापि, हे प्रमाण ७० टक्क्यांपेक्षा अधिक आहे.
साथीचा वाढता प्रादुर्भाव पाहता पुढच्या वर्षापर्यंत इबोलाग्रस्तांची संख्या १ दशलक्षावर जाऊ शकते, असा इशाराही या सर्वेक्षणातून देण्यात आला आहे. इबोलाने आतापर्यंत ५ हजार लोक दगावले आहेत. या साथीचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे चिंता व्यक्त होत आहे. (वृत्तसंस्था)