शाळा बंद, कर्मचाऱ्यांना WFH, इंधन वाचवण्यासाठी 'या' देशात नवीन फर्मान!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2022 05:14 PM2022-06-27T17:14:15+5:302022-06-27T17:17:12+5:30

Sri Lanka Economic Crisis : इंधनाची (Fuel) बचत करण्यासाठी सरकारने शाळा बंद केल्या असून कर्मचाऱ्यांना घरून काम  (Work From Home) करण्यास सांगितले आहे.

economic crisis hit sri lanka shuts schools and work from home to save fuel | शाळा बंद, कर्मचाऱ्यांना WFH, इंधन वाचवण्यासाठी 'या' देशात नवीन फर्मान!

शाळा बंद, कर्मचाऱ्यांना WFH, इंधन वाचवण्यासाठी 'या' देशात नवीन फर्मान!

Next

आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या श्रीलंकेच्या (Sri Lanka Economic Crisis)  अडचणी दिवसेंदिवस वाढत आहेत. परकीय चलनाच्या (Foreign Exchange) तीव्र टंचाईमुळे, श्रीलंकेला आपल्या नागरिकांसाठी आवश्यक गोष्टी आयात करता येत नाहीत. श्रीलंकेत पेट्रोल-डिझेलबाबत (Petrol Diesel in Sri Lanka)अशी परिस्थिती निर्माण झाली आहे की, सरकारला लष्कराला उतरवावे लागले आहे. श्रीलंकेतील सैनिकांनी सोमवारी तीव्र इंधन टंचाई दरम्यान पेट्रोलसाठी रांगेत उभे असलेल्या लोकांना टोकन वाटप केले. त्याचबरोबर इंधनाची (Fuel) बचत करण्यासाठी सरकारने शाळा बंद केल्या असून कर्मचाऱ्यांना घरून काम  (Work From Home) करण्यास सांगितले आहे.

श्रीलंकेला परकीय चलनाची तीव्र टंचाई आहे. यामुळे श्रीलंकेला अन्न, इंधन आणि औषधे यांसह जीवनावश्यक वस्तू आयात करणे शक्य होत नाही. सरकारने आपल्या नागरिकांसाठी परकीय चलन ठेवण्याची मर्यादा निश्चित केली आहे. आता श्रीलंकेतील लोक केवळ10,000 डॉलरचे परकीय चलन स्वतःकडे ठेवू शकतात, तर आधी ही मर्यादा 15,000 डॉलरपर्यंत होती.

रायटर्सच्या वृत्तानुसार, लोक अनेक दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलसाठी रांगेत उभे आहेत. 67 वर्षीय ऑटोरिक्षा चालक डब्ल्यू.डी. शेल्टन म्हणाले की, मी चार दिवसांपासून रांगेत आहे. या दरम्यान मला नीट झोपही आली नाही आणि काही खाल्ले नाही. आपण कमावलो नाही तर आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करणार? श्रीलंकेची राजधानी कोलंबो येथील इंधन स्टेशनवर ते 24 व्या क्रमांकावर रांगेत उभे होते.

श्रीलंकेत सुमारे 9,000 टन डिझेल आणि 6,000 टन पेट्रोलचा साठा आहे. वीज आणि ऊर्जा मंत्री कांचना विजेसेकेरा यांनी रविवारी सांगितले होते की, तेलाची नवीन खेप कधी येईल याबद्दल काहीही सांगता येणार नाही. सरकारने पुढील सूचना मिळेपर्यंत कर्मचाऱ्यांना घरून काम करण्यास सांगितले आहे. त्याचवेळी राजधानी कोलंबो आणि आसपासच्या परिसरात आठवडाभर शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत. दरम्यान, श्रीलंका 51 अब्ज डॉलर्सचे विदेशी कर्ज फेडण्यास असमर्थ आहे. श्रीलंकेचे पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे यांनीही नागरिकांना इंधन जपून वापरण्याचे आवाहन केले आहे.
 

Web Title: economic crisis hit sri lanka shuts schools and work from home to save fuel

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.