ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटीतून मलाला युसुफजाई घेणार शिक्षण
By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2017 08:10 PM2017-08-17T20:10:00+5:302017-08-17T20:10:07+5:30
पाकिस्तानच्या खोऱ्यात मुलींच्या शिक्षणासाठी काम करणाऱ्या आणि नोबेल पुरस्कार विजेती मलाला युसुफजाई जगातील सर्वांत मोठ्या युनिव्हर्सिटीत शिक्षण घेणार आहे. मलालाने याबाबत स्वत: ट्विट करुन माहिती दिली आहे.
बर्मिंघम, दि. 17 - पाकिस्तानच्या खोऱ्यात मुलींच्या शिक्षणासाठी काम करणाऱ्या आणि नोबेल पुरस्कार विजेती मलाला युसुफजाई जगातील सर्वांत मोठ्या युनिव्हर्सिटीत शिक्षण घेणार आहे. मलालाने याबाबत स्वत: ट्विट करुन माहिती दिली आहे.
जगभरातील नामांकित युनिव्हर्सिटी म्हणून ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटीला ओळखले जाते. या ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटीत मलाला युसुफजाई शिक्षण घेणार आहेत. याबाबत ट्विटवरुन माहिती देताना तिने लिहिले आहे की, ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटीत शिक्षण घेण्यास मी खूप उत्साहित आहे.
So excited to go to Oxford!! Well done to all A-level students - the hardest year. Best wishes for life ahead! pic.twitter.com/miIwK6fNSf
— Malala (@Malala) August 17, 2017
ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटीत मलाला युसुफजाई तत्त्वज्ञान, राजकारण आणि अर्थशास्त्र या विषयांचा अभ्यास करणार आहे. मलाला युसुफजाई हिच्यावर ऑक्टोबर 2012 मध्ये पाकिस्तानात तालिबानी अतिरेक्यांनी हल्ला केला होता. त्यावेळी तिच्या डोक्यात गोळ्या लागल्या होत्या. या घटनेनंतर तिला तत्काळ उपचारासाठी ब्रिटन येथे हलविण्यात आले होते. त्यानंतर या परिस्थितीतून मलाला पूर्ण बरी झाली. त्यानंतर तिने ब्रिटनमध्येच आपले शालेय शिक्षण पूर्ण केले आहे.
याचबरोबर, बालकामगार पद्धत आणि लहान मुलांच्या तस्करीविरुद्ध लढा देणारे भारतातील कैलाश सत्यार्थी आणि मलाला युसुफजाई यांना 2014 मध्ये जागतिक प्रतिष्ठेचा शांततेचा नोबेल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.