अमेरिकेत दोन भारतीयांना शिक्षा

By admin | Published: June 11, 2016 06:09 AM2016-06-11T06:09:58+5:302016-06-11T06:09:58+5:30

अमेरिकेत दोन वेगवेगळ्या घटनांत भारतीय वंशाच्या दोन व्यक्तींना न्यायालयाने शिक्षा सुनावली

Education for two Indians in the US | अमेरिकेत दोन भारतीयांना शिक्षा

अमेरिकेत दोन भारतीयांना शिक्षा

Next


न्यूयॉर्क : अमेरिकेत दोन वेगवेगळ्या घटनांत भारतीय वंशाच्या दोन व्यक्तींना न्यायालयाने शिक्षा सुनावली आहे, तर भारतीय वंशाच्याच एका मुलावर पोलिसांच्या हत्येचा कट केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे.
पहिल्या प्रकरणात रुग्णांना डायग्नोस्टिक कंपनीकडे पाठविण्याच्या प्रकरणात १,७४,००० डॉलरपेक्षा अधिक लाच घेतल्याच्या आरोपात येथील एका न्यायालयाने भारतीय वंशाचे फिजिशियन न्यूजर्सीचे परेश पटेल (५५) यांना एका वर्षाची शिक्षा सुनावली आहे. परेश पटेल यांनी सप्टेबर २००९ ते डिसेंबर २०१३ या काळात नीता पटेल आणि कीर्तिश पटेल यांच्या एका डायग्नोस्टिक कंपनीत रुग्णांना पाठविण्यासाठी १,७४,००० डॉलरची रक्कम लाच म्हणून घेतल्याचे स्पष्ट झाले. ही रक्कमही आता जप्त करण्यात आली आहे.
पोलिसांच्या हत्येचा कट
बनावट ओळखपत्राच्या आधारे बंदूक खरेदी करून न्यूयॉर्कच्या
पोलीस अधिकाऱ्यांच्या हत्येचा कट केल्याचा आरोप येथील भारतीय वंशाच्या किशोरवयीन रणबीर सिंंग शेरगिल (१८) याच्यावर ठेवण्यात आला आहे.
रणबीर याने गत महिन्यात आपल्या घरातील सदस्यांनाही मारण्याची धमकी दिली होती.
त्याच्या बेडरूममधून एक हँडगन, गोळ्यांचा बॉक्स, सात मासिके सापडली. ओहियो येथे आपण
बंदूक खरेदी करण्यासाठी गेलो
होतो, अशी कबुली रणबीरने दिली आहे. पोलिसांना मारण्याच्या एका कटाची माहिती रणबीरच्या फोनमध्ये सापडली. या पार्श्वभूमीवर त्याला अटक करण्यात आली आहे. गत आठवड्यातच कॅलिफोर्नियात मानेक सरकार या भारतीय विद्यार्थ्याने प्रोफेसरची हत्या करून आत्महत्या केली होती. (वृत्तसंस्था)
>पंधरा महिन्यांची शिक्षा
विना परवाना हत्यारांचा व्यापार केल्याप्रकरणी येथील एका न्यायालयाने भारतीय व्यक्तीच्या २१ वर्षीय तरुणास १५ महिन्यांची शिक्षा सुनावली आहे. शर्मा सुखदेव असे या तरुणाचे नाव आहे.
डिसेंबरमध्ये त्याने आपला गुन्हा कबूल केला होता. जिल्हा न्यायाधीशांनी सुखदेव याला तीन हजार डॉलरचा दंडही लावला आहे.
सुखदेव याने एका व्यक्तीला २०१४ मध्ये तीन हत्यारे आणि दारूगोळा विकला होता.

Web Title: Education for two Indians in the US

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.