इसिस तत्वज्ञानाचा प्रभाव ओसरला
By admin | Published: March 15, 2015 11:09 PM2015-03-15T23:09:13+5:302015-03-15T23:09:13+5:30
इस्लामिक स्टेट आॅफ इराक अँड सिरियाच्या (इसिस) तत्वज्ञान व शिकवणुकीबाबत इंटरनेटवर जो प्रचार केला जायचा त्याला विरोध करणारा मजकूर मध्य
डिप्पी वांकाणी, मुंबई
इस्लामिक स्टेट आॅफ इराक अँड सिरियाच्या (इसिस) तत्वज्ञान व शिकवणुकीबाबत इंटरनेटवर जो प्रचार केला जायचा त्याला विरोध करणारा मजकूर मध्य पूर्व देशांमधूनच वाढल्यामुळे इसिसच्या घातक प्रचाराला अटकाव झाला आहे. इसिसच्या प्रचाराला छेद देणारा मजकूर वाढल्यामुळे इसिसला भारतासारख्यादेशातून सहानुभूतीदार व प्रत्यक्ष कामे करण्याासाठी नव्याने कोणी मिळविणे सोपे राहिलेले नाही.
महाराष्ट्र दहशतवादविरोधी तुकडीची (अँटी टेररिस्ट स्क्वॅड-एटीएस) एक शाखा इसिसकडून इंटरनेटवर चालणाऱ्या मूलतत्ववादी प्रचारावर लक्ष ठेवून असते. या शाखेने आपल्या ताज्या अहवालात इसिसच्या तथाकथित तत्वज्ञानाला विरोध करणारा मजकूर मध्यपूर्वेकडून वाढत असल्याचे म्हटले आहे. या शाखेची जबाबदारी असलेल्या भारतीय पोलीस सेवेतील वरिष्ठ अधिकाऱ्याने ‘लोकमत’ ला सांगितले की इसिसच्या विरोधातील मजकूर इंटरनेटवर वाढत असल्यामुळे तरुणांवर इसिसच्या तत्वज्ञानाचा प्रभाव पाडणे खूपच अवघड झाले आहे व त्यामुळे इसिसमध्ये नव्याने भरतीही अशक्य बनली आहे. हा अधिकारी म्हणाला, ‘‘इसिसची रचनाच चुकीची असल्याची चर्चा मध्यपूर्वेतील व्यासपीठावर करणाऱ्यांची संख्या लक्षणीयरित्या वाढली आहे.’’ हे सहभागी वक्ते धार्मिक अंगाने वादविवाद करतात व इसिस ज्या ज्या तत्वांचा आधार घेते तो आधार कसा चुकीचा आहे हे, हे वक्ते धार्मिक तत्वांच्या आधारे खोडून काढतात, असेही तो म्हणाला. धार्मिक भावनांना चिथावणी देण्यास पुरेशा असलेल्या इंटरनेटवरील अनेक पोस्ट आम्ही २०१४ मध्ये ब्लॉक केल्या होत्या.