सिंगल डोस लस डेल्टासह प्रत्येक विषाणूवर प्रभावी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 3, 2021 06:11 AM2021-07-03T06:11:26+5:302021-07-03T06:11:56+5:30

जॉन्सन अँड जॉन्सनचा दावा

Effective on every virus with single dose vaccine delta | सिंगल डोस लस डेल्टासह प्रत्येक विषाणूवर प्रभावी

सिंगल डोस लस डेल्टासह प्रत्येक विषाणूवर प्रभावी

Next
ठळक मुद्देकंपनीने असा दावा केला आहे की, लोकांना रुग्णालयात दाखल होण्यापासून आणि मृत्यूपासून वाचवले

वॉशिंग्टन : कोरोनाविरोधातील सिंगल डोस व्हायरसच्या डेल्टा व्हेरिएंटविरुद्ध प्रभावी असल्याचा दावा अमेरिकेतील फार्मा कंपनी जॉन्सन अँड जॉन्सनने केला आहे. सिंगल डोस लस गंभीर किंवा अत्यंत गंभीर आजाराच्या विरुद्ध ८५ टक्के प्रभावी असल्याचे आढळले आहे.

कंपनीने असा दावा केला आहे की, लोकांना रुग्णालयात दाखल होण्यापासून आणि मृत्यूपासून वाचवले. लस घेतलेल्या ८ जणांच्या रक्ताच्या नमुन्यांमधून हे उघडकीस आले आहे की, ही लस डेल्टासह सर्व प्रकारच्या व्हेरिएंटवर प्रभावी आहे. जॉन्सन अँड जॉन्सनचे मुख्य वैज्ञानिक अधिकारी पॉल स्टॉफल्स म्हणाले, “आज जाहीर केलेल्या अभ्यासानुसार जॉन्सन अँड जॉन्सनची लस जगभरातील लोकांचे जीवन वाचविण्यात मदत करते.”  लसीच्या पहिल्या मात्रेच्या २९ दिवसांत डेल्टा व्हेरिएंटवर परिणाम होत असल्याचा दावा करण्यात आला. दक्षिण आफ्रिका आणि ब्राझीलसह या लसीचा प्रभाव जागतिक स्तरावर सारखाच असल्याचे कंपनीने म्हटले होते. अभ्यासादरम्यान, या भागांमध्ये बीटा आणि जीटा व्हेरिएंटचे प्रमाण अधिक आढळले होते.

बूस्टर मात्रेची गरज नाही - कंपनी
सध्याच्या आकडेवारीच्या आधारे जोहान वान हूफ म्हणाले की, कंपनीला असा विश्वास आहे की, ज्या लोकांना ही लस दिली गेली आहे, त्यांना एका वर्षाच्या आत बूस्टर मात्रेची गरज भासणार नाही. जर गरज वाटली तरी सुद्धा फॉर्म्युलेशन बदलावा लागेल, असे आम्हाला वाटत नाही.

Web Title: Effective on every virus with single dose vaccine delta

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.