इजिप्त : 183 जणांची फाशीची शिक्षा कायम
By Admin | Published: June 22, 2014 01:30 AM2014-06-22T01:30:06+5:302014-06-22T01:30:06+5:30
इजिप्तमधील एका न्यायालयाने मुस्लिम ब्रदरहूडचे नेते मोहंमद बादेई यांच्यासह संघटनेच्या 183 समर्थकांची फाशीची शिक्षा कायम ठेवली आहे.
>कैरो : इजिप्तमधील एका न्यायालयाने मुस्लिम ब्रदरहूडचे नेते मोहंमद बादेई यांच्यासह संघटनेच्या 183 समर्थकांची फाशीची शिक्षा कायम ठेवली आहे. या सर्वावर 2क्13 मध्ये एका पोलीस ठाण्यावर हल्ला केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी गेल्या एप्रिलमध्ये एका न्यायमूर्तीनी 683 जणांना फाशीची शिक्षा ठोठावल्यानंतर या निकालावर प्रचंड टीका झाली होती.
शिक्षा कायम ठेवलेल्यांमध्ये या संघटनेचे नेते मोहंमद बादेई यांचाही समावेश आहे. या निकालाविरुद्ध अपील केले जाण्याची शक्यता आहे. लष्करी सरकारने गेल्या डिसेंबरपासून आतार्पयत शेकडो विरोधकांना फाशीची शिक्षा ठोठावली आहे. मुस्लिम ब्रदरहूडचे नेते मोहंमद मुर्सी यांच्या सरकारविरुद्ध प्रचंड असंतोष पसरल्यानंतर लष्कराने त्यांचे सरकार उलथवून टाकले होते. त्यानंतर मुर्सी समर्थकांनी हिंसक निदर्शने केली होती.
या आरोपींवर 14 ऑगस्ट 2क्14 रोजी मिन्यातील पोलीस कर्मचा:यांच्या हत्येचा प्रयत्न केल्याचा आरोप होता. याच दिवशी कैरोत झालेल्या संघर्षात पोलिसांनी मुस्लिम ब्रदरहूडच्या शेकडो समर्थकांना ठार केले होते.
आरोपींवर तोडफोड आणि नागरिकांत दहशत पसरविण्याचे आरोपही ठेवण्यात आले होते. 11क् आरोपी उपस्थित नसताना 683 जणांविरुद्ध खटला चालविण्यात आला. यातील 183 जणांच्या फाशीवर मिन्या येथील न्यायालयाने शिक्कामोर्तब केले, तर चार आरोपींना 15 ते 25 वर्षाचा कारावास ठोठावला. उर्वरित आरोपींची सुटका करण्यात आली. (वृत्तसंस्था)