'इजिप्त एअर' विमानाचे अपहरणकर्ते लहान मुलं आणि महिलांना सोडण्यास तयार
By Admin | Published: March 29, 2016 12:46 PM2016-03-29T12:46:32+5:302016-03-29T12:46:32+5:30
इजिप्त एअरच्या अपहरण झालेल्या विमानातून लहान मुलं आणि महिलांना सोडून देण्याची तयारी अपहरणकर्त्यांनी दर्शवली आहे
>ऑनलाइन लोकमत -
कैरो, दि. २९ - इजिप्त एअरच्या अपहरण झालेल्या विमानातून लहान मुलं आणि महिलांना सोडून देण्याची तयारी अपहरणकर्त्यांनी दर्शवली आहे. अपहरणकर्त्यांनी 20 लोकांची सुटका केली असल्याची माहितीदेखील मिळाली आहे. तसंच अपहरणकर्त्यांनी वैमानिकाला विमानातून हाकलून दिलं असून विमानाचा ताबा घेतला आहे. नागरी उड्डाण वाहतूक मंत्रालयाने दिलेल्या माहितीप्रमाणे अपहरण झालेल्या इजिप्त एअर विमानाच्या वैमानिकला अपहरणकर्त्यांने आत्मघाती स्फोट करण्याची प्रवाशाने धमकी दिली होती.
इजिप्त एअरच्या MS181 या विमानाचं अपहरण करण्यात आलं आहे. अपहरण करुन विमानाचं सायप्रस येथील लरनाका विमातळावर लॅडींग करण्यात आलं. अलेक्झांड्रियाहून कैरोला जाणा-या विमानाने सकाळी उड्डाण केले असता अचानक सायप्रस येथील लरनाका विमानतळावर एमर्जन्सी लँडींग करण्याची विनंती केली. अपहरणकर्त्यांनी 8.30 वाजता कंट्रोल टॉवरशी संपर्क साधून विमानाचं लॅडींग करण्यासाठी रनवे मोकळा करण्यास सांगितला, त्यानंतर 8.50 ला विमानाला विमानाचं लॅडींग करण्यासाठी परवानगी देण्यात आली असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. विमानात एकूण 55 प्रवासी आणि 7 क्रू मेम्बर्स आहेत. अपहरणकर्त्यांनी अजूनपर्यंत कोणतीही मागणी केलेली नाही. बचावकार्य पथकांना एअरपोर्टच्या दिशेने पाठवण्यात आले आहे.