66 प्रवाशांसह इजिप्त एअरचं विमान रडारवरुन गायब
By Admin | Published: May 19, 2016 10:39 AM2016-05-19T10:39:51+5:302016-05-19T10:58:50+5:30
इजिप्त एअरचं 66 प्रवाशांना घेऊन जाणारं विमान MS804 अचानक रडारवरुन गायब झालं आहे
ऑनलाइन लोकमत -
कैरो, दि. 19 - इजिप्त एअरचं 66 प्रवाशांना घेऊन जाणारं विमान MS804 अचानक रडारवरुन गायब झालं आहे. पॅरिसहून कैरोला जाणा-या या विमानात 56 प्रवासी आणि 10 क्रू मेम्बर्स होते. इजिप्तच्या नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने विमानाचा शोध घेण्यासाठी सर्च ऑपरेशन सुरु केलं आहे.
एअरबस A320 जमिनीपासून 37 हजार फुटांवर उडत असताना स्थानिक वेळेप्रमाणे सकाळी 2.45 वाजता विमान रडारवरुन गायब झाल्याची माहिती इजिप्त एअरने दिली आहे.
विमानाने 11 वाजून 9 मिनिटांनी चार्ल्स द गॉल येथून उड्डाण केले होते अशी माहिती इजिप्त एअरने दिली आहे. मात्र काही वेळातच हे विमान रडारवरून गायब झाले. कंट्रोल रूमशी कोणताही संपर्क होत नसल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. इजिप्तच्या आसपासच्या भागावर इसीस या दहशतवादी संघटनेचे वर्चस्व आहे. त्यामुळे विमानाला दहशतवाद्यांनी टार्गेट केल्याची शंका व्यक्त केली जात आहे.
इजिप्त एअर विमानाचं अपहरणनाट्य -
29 मार्चला इजिप्त एअर विमानाचं अपहरण करण्यात आलं होतं. अलेक्झांड्रियाहून कैरोला जाणा-या इजिप्त एअरच्या MS181 या विमानाचं अपहरण करण्यात आलं होतं. अपहरण करणा-या व्यक्तीने स्फोटकांचा बेल्ट बांधला असून उडवून देण्याची धमकी देत विमानाचं एमर्जन्सी लॅडींग करण्यास सांगितलं होतं. सैफ अल दिन मुस्तफा या व्यक्तीने हे अपहरण केलं होतं. पोलिसांनी त्याला नंतर अटक केली होती.
An informed source at EGYPTAIR reported that EGYPTAIR Flight No MS 804 has lost communication with radar tracking system at 02:45 (CLT)
— EGYPTAIR (@EGYPTAIR) May 19, 2016
EGYPTAIR A320 was at a height of 37.000ft, and disappeared after entering the Egyptian airspace with 10 miles.
— EGYPTAIR (@EGYPTAIR) May 19, 2016
EGYPTAIR has contacted the concerned authorities and bodies and inspection is underway through the rescue teams.
— EGYPTAIR (@EGYPTAIR) May 19, 2016