इजिप्त एअर विमानाचं अपहरणनाट्य संपलं, अपहरणकर्ता अटकेत
By admin | Published: March 29, 2016 05:41 PM2016-03-29T17:41:58+5:302016-03-29T17:48:57+5:30
इजिप्त एअर विमानाचे अपहरणनाट्य अखेर संपलं असून अपहरणकर्त्याला अटक करण्यात आली आहे. ओलीस ठेवलेले सर्व प्रवासी सुरक्षित असल्याची माहिती इजिप्त एअरने ट्विटरच्या माध्यमातून दिली आहे
Next
ऑनलाइन लोकमत -
कैरो, दि. २९ - इजिप्त एअर विमानाचे अपहरणनाट्य अखेर संपलं असून अपहरणकर्त्याला अटक करण्यात आली आहे. ओलीस ठेवलेले सर्व प्रवासी सुरक्षित असल्याची माहिती इजिप्त एअरने ट्विटरच्या माध्यमातून दिली आहे. अलेक्झांड्रियाहून कैरोला जाणा-या इजिप्त एअरच्या MS181 विमानाचं अपहरण करण्यात आलं होतं. अपहरण करणा-या व्यक्तीने स्फोटकांचा बेल्ट बांधला असून उडवून देण्याची धमकी देत विमानाचं एमर्जन्सी लॅडींग करण्यास सांगितलं होतं.
इजिप्त एअर विमानाचं अपहरण करणारी व्यक्ती इजिप्तची नागरिक असून त्याचं नाव सैफ अल दिन मुस्तफा असल्याचं इजिप्त एअरने स्पष्ट केलं होतं. सुरुवातीला त्याचं नाव इब्राहिम समाहा असल्याचं सांगण्यात येतं होतं. तसंच हे अपहरण दहशतवाद्यांनी केलं नसल्याचही सायप्रसच्या अध्यक्षांनी स्पष्ट केलं होतं. सुरुवातीला काहीच मागणी न करणा-या अपहरणकर्त्यांने नंतर लरनाकामध्ये राहणा-या आपल्या माजी पत्नीला पत्र पाठवण्याची मागणी केली होती त्यानंतर कारागृहातून आरोपींना सोडून देण्याची मागणी केली होती.
अपहरणकर्त्यांकडे असलेला बेल्ट खरा आहे की खोटा याचा तपास केला जात आहे. तसंच अपहरण करण्यामागचा नेमका हेतू काय होता ? याचीदेखील तपासणी केली जात आहे. अपहरणाचा त्याच्या पत्नीशी संबंध असल्याची शंका सध्या व्यक्त केली जात आहे. अपहरणकर्चा माथेफिरु असण्याची शक्यचा वर्तवली जात आहे. विमानात 8 ब्रिटीश आणि 10 अमेरिकन नागरिक होते. अपहरणकर्त्यांने केबिन क्रू आणि चार परदेशी नागरिक वगळता सर्व प्रवाशांची सुटका केली होती.
अपहरणकर्त्यांने 8.30 वाजता कंट्रोल टॉवरशी संपर्क साधून विमानाचं लॅडींग करण्यासाठी रनवे मोकळा करण्यास सांगितला, त्यानंतर 8.50 ला विमानाला विमानाचं लॅडींग करण्यासाठी परवानगी देण्यात आली आली होती. विमानात एकूण 55 प्रवासी आणि 7 क्रू मेम्बर्स होते. विमानात एक अपहरणकर्ता असून तो आत्मघाती हल्लेखोर असल्याची माहिती सुरुवातीला मिळाली होती, तसंच विमानात बॉम्ब असण्याची शक्यतादेखील वर्तवण्यात येत होती.
Official sources at EGYPTAIR declared the release of all the hostages and the arrest of the hijacker. #EgyptAir
— EGYPTAIR (@EGYPTAIR) March 29, 2016