बॉम्बस्फोटानं हादरलं इजिप्त , 45 जण ठार तर 119 पेक्षा जास्त जखमी

By admin | Published: April 9, 2017 02:41 PM2017-04-09T14:41:14+5:302017-04-09T22:17:40+5:30

इजिप्त चर्चबाहेर बॉम्बस्फोट झाल्याचं वृत्त एएफपीनं दिलं आहे. या बॉम्बस्फोटात 13 जणांचा मृत्यू, तर 25 जण जखमी असल्याचं प्राथमिक वृत्त समजलं

Egypt bomb blasts rock Egypt, 45 killed and more than 119 injured | बॉम्बस्फोटानं हादरलं इजिप्त , 45 जण ठार तर 119 पेक्षा जास्त जखमी

बॉम्बस्फोटानं हादरलं इजिप्त , 45 जण ठार तर 119 पेक्षा जास्त जखमी

Next

ऑनलाइन लोकमत

इजिप्त, दि. 9-  इजिप्तमध्ये चर्चबाहेर झालेल्या भीषण स्फोटात 45 जण ठार झाले आहेत. मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त होत आहे. वृत्तसंस्था एएफपीनं याबाबत वृत्त दिलं आहे. या बॉम्बस्फोटात45 जणांचा मृत्यू, तर 119 पेक्षा जास्त जखमी असल्याचं प्राथमिक वृत्त समजलं आहे.

कैरोपासून 120 किलोमीटरवरील उत्तर इजिप्तमधल्या तांता या शहरातील कॉप्टिक ख्रिश्चन चर्चच्या बाहेर हा बॉम्बस्फोट घडवण्यात आला आहे. येशूंचे उपासक रविवार साजरा करण्यासाठी चर्चमध्ये जमा झाले होते. त्यादरम्यानच हा बॉम्बस्फोट करण्यात आला आहे.  याच परिसरात ख्रिश्चनांची जास्त लोकवस्ती आहे. या बॉम्बस्फोटाची अद्याप कोणीही जबाबदारी स्वीकारली नाही. मात्र हा बॉम्बस्फोट इस्लामिक दहशतवाद्यांनी घडवून आणल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. इजिप्तच्या सरकारी माध्यमांनी या भीषण स्फोटाच्या घटनेची माहिती दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या भीषण स्फोटात आतापर्यंतस 45 जण ठार झाल्याचे सांगण्यात येत आहे. तर ४० हून अधिक जखमी झाले आहेत.

गेल्या काही काळात येथील ख्रिश्चन समाजाला लक्ष्य केले जात आहे. दहशतवादी संघटनांकडून या समाजाला सातत्याने लक्ष्य केले जात आहे. काही आठवड्यांनी पोप फ्रान्सिस इजिप्तच्या दौऱ्यावर येत आहेत. त्या पार्श्वभूमीवर या घटनेमुळे चिंता व्यक्त करण्यात येत आहे. तर गेल्या काही दिवसांपूर्वी इजिप्तमधल्या पोलीस ट्रेनिंग सेंटरवरही हल्ला करण्यात आला होता. त्यात 13 अधिकारी जखमी झाले होते. 
 

Web Title: Egypt bomb blasts rock Egypt, 45 killed and more than 119 injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.