इजिप्तच्या राष्ट्राध्यक्षपदी सिसी
By admin | Published: June 4, 2014 12:35 AM2014-06-04T00:35:32+5:302014-06-04T00:35:32+5:30
कैरो : इजिप्तमधील राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत माजी लष्करप्रमुख अब्देल फतेह अल-सिसी हे ९६. ९ टक्के मते मिळवून विजयी झाले असून, याबाबतची अधिकृत घोषणा इजिप्तच्या निवडणूक आयोगाने मंगळवारी रात्री केली़
Next
क रो : इजिप्तमधील राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत माजी लष्करप्रमुख अब्देल फतेह अल-सिसी हे ९६. ९ टक्के मते मिळवून विजयी झाले असून, याबाबतची अधिकृत घोषणा इजिप्तच्या निवडणूक आयोगाने मंगळवारी रात्री केली़ निवडणूक आयोगाचे अध्यक्ष अन्वर अल-सिसी यांनी सांगितले की, अल-सिसी यांना २३. ७८ दशलक्ष मते मिळाली तर त्यांचे एकमेव प्रतिस्पर्धी डाव्या विचारसरणीचे हमदीन सबाही यांना केवळ तीन टक्के मते मिळाली. निवडणूक निकालाची घोषणा झाल्यानंतर राजधानी कैरोच्या प्रसिद्ध तहरीर चौकात शेकडो लोक जमा झाले. त्यांनी आतषबाजी करून विजयाचा आनंद साजरा केला. त्यांनी लष्कराच्या समर्थनार्थ गीतेही गायली. या निवडणुकीसाठी ४७.४५ टक्के मतदान झाले होते. इजिप्तमधील पहिले लोकनियुक्त सरकार अल-सिसी यांनीच उलथवून टाकले होते. जनक्षोभामुळे होस्नी मुबारक यांना पायउतार व्हावे लागल्यानंतर झालेल्या निवडणुकीद्वारे मुस्लिम ब्रदरहुडच्या मोहंमद मुर्सी यांचे सरकार सत्तेवर आले होते. मात्र, मुर्सी यांच्याविरुद्धही प्रचंड असंतोष निर्माण होऊन देशात यादवी उफाळण्याचे संकट निर्माण झाल्याने अल-सिसी यांनी लष्करी बळाचा वापर करत गेल्यावर्षी मुर्सी यांचे सरकार उलथवून टाकले होते. राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजय मिळाल्याने मुर्सी यांचे सरकार उलथवून टाकण्याच्या त्यांच्या कृतिवरही एकप्रकारे शिक्कामोर्तब झाले आहे. (वृत्तसंस्था)