पॅरिसमधील आयफेल टॉवर बॉम्बने उडवून देण्याची धमकी; पर्यटकांना काढलं बाहेर, सर्च ऑपरेशन सुरू

By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2023 08:11 PM2023-08-12T20:11:51+5:302023-08-12T20:15:01+5:30

Eiffel Tower : घटनेची माहिती मिळताच सुरक्षा दलाने संपूर्ण परिसराला वेढा घातला असून बॉम्ब शोधक पथकाकडून सर्च ऑपरेशन सुरु आहे. 

Eiffel Tower evacuated after receiving bomb threat | पॅरिसमधील आयफेल टॉवर बॉम्बने उडवून देण्याची धमकी; पर्यटकांना काढलं बाहेर, सर्च ऑपरेशन सुरू

पॅरिसमधील आयफेल टॉवर बॉम्बने उडवून देण्याची धमकी; पर्यटकांना काढलं बाहेर, सर्च ऑपरेशन सुरू

googlenewsNext

फ्रान्सची (France) राजधानी पॅरिसमधील आयफेल टॉवर उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे. बॉम्बची माहिती मिळाल्यानंतर आयफेल टॉवर पूर्णपणे रिकामा करण्यात आला आहे. रॉयटर्स या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, पुढील आदेशापर्यंत आयफेल टॉवर बंद करण्यात आला आहे. घटनेची माहिती मिळताच सुरक्षा दलाने संपूर्ण परिसराला वेढा घातला असून बॉम्ब शोधक पथकाकडून सर्च ऑपरेशन सुरु आहे. 

पॅरिसमधील आयफेल टॉवरवर काही तासांत बॉम्बस्फोट होणार असल्याची बातमी शनिवारी दुपारी आली. या माहितीनंतर आयफेल टॉवरचे तीन मजले पूर्णपणे रिकामे करण्यात आले. बॉम्ब निकामी तज्ज्ञांसह पोलिसांनी संपूर्ण परिसराची नाकेबंदी केली. एका रेस्टॉरंटमध्ये बॉम्ब लपवून ठेवल्याची माहिती मिळाली होती. यानंतर सर्व लोकांना टॉवर परिसर रिकामी करण्यास सांगण्यात आले. रेस्टॉरंटसह संपूर्ण टॉवरमध्ये झडती घेण्यात येत आहे. आतापर्यंत कोणत्याही प्रकारचा बॉम्ब मिळाल्याची माहिती मिळालेली नाही.

दरम्यान, या घटनेबाबत प्रवक्त्याने माहिती दिली की, शनिवारी दुपारी दीडच्या सुमारास आयफेल टॉवर उडवून देण्याची धमकी देण्यात आली होती. याची माहिती मिळताच पर्यटकांना आयफेल टॉवरचा परिसर रिकामा करण्यास सांगण्यात आले. दरम्यान,पॅरिसमधील आयफेल टॉवर जगभरातील प्रसिद्ध पर्यटन स्थळांपैकी एक आहे. यामुळे येथे जगभरातील पर्यटक भेट देत असतात. दररोज हजारो देशी-विदेशी पर्यटक आयफेल टॉवर पाहण्यासाठी येत असतात.

Web Title: Eiffel Tower evacuated after receiving bomb threat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.