आयफेल टॉवर, वेलकम टू ट्विटर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2015 02:49 AM2015-12-29T02:49:31+5:302015-12-29T13:00:58+5:30
जगप्रसिद्ध ताजमहाल व स्टॅच्यू आॅफ लिबर्टीने १२६ वर्षे जुन्या आयफेल टॉवरचे टिष्ट्वटरवर स्वागत केले आहे. जगात सर्वाधिक पर्यटक आकर्षित करणारा ‘आयफेल टॉवर’ गेल्या
लंडन : जगप्रसिद्ध ताजमहाल व स्टॅच्यू आॅफ लिबर्टीने १२६ वर्षे जुन्या आयफेल टॉवरचे ट्विटरवर स्वागत केले आहे. जगात सर्वाधिक पर्यटक आकर्षित करणारा ‘आयफेल टॉवर’ गेल्या आठवड्यात ‘ट्विटर’चा अधिकृत सदस्य बनला.
आयफेल टॉवरने आपल्या अकाऊंटवर पहिले ट्विट फ्रेंच आणि इंग्रजी भाषेत केले आहे. या ट्विटमध्ये तो म्हणतो, मी १८८९ पासून पॅरिसवासीय असून आता ट्विटररवरही दिमाखात झळकत आहे. मुगल बादशहा शहाजहानने बांधलेला आणि जगातील आश्चर्यांपैकी एक अशा ताजमहालने ‘वेलकम’ असे ट्विट करत ‘आयफेल’चे ट्विटरवर स्वागत केले, तर आयफेलने खूप खूप आभार म्हणत ताजमहालच्या आॅनलाईन स्वागताचा स्वीकार केला.
१०६३ फूट उंचीच्या आयफेल टॉवरला दरवर्षी जगभरातील ७० लाख पर्यटक भेट देतात. आयफेलचे फेसबुक अकाऊंट असून त्यावर त्याचे १७ लाख चाहते आहेत. मात्र, आयफेलने गेल्या आठवड्यापर्यंत ट्विटरपासून स्वत:ला दूर ठेवले होते. ‘अॅट द रेट ला टुरआयफेल’चे ट्विटरवर आगमन होताच इतर जगप्रसिद्ध स्मारकांच्या अधिकृत खात्यांनी त्याचे तातडीने स्वागत केले, असे टेलिग्राफने म्हटले आहे. माझ्या प्रिय भगिनीचे ट्विटरवर स्वागत, असे ट्विट स्टॅच्यू आॅफ लिबर्टीने केले आहे. स्टॅच्यू आॅफ लिबर्टीच्या मूर्तीची संकल्पना एका फ्रेंच मूर्तिकाराची असून आयफेलने ही मूर्ती साकारली.
१९ व्या शतकात ही मूर्ती फ्रान्सच्या जनतेकडून अमेरिकेला भेट देण्यात आली होती. ताजमहालसह न्यूयॉर्कच्या एम्पायर स्टेट बिल्डिंगनेही आयफेल टॉवरचे टिष्ट्वटरवर स्वागत केले आहे. आयफेल टॉवरबाबतचे वृत्त, ऐतिहासिक तथ्ये याची माहिती देण्यासाठी आपण ट्विटर अकाऊंट उघडण्याचा निर्णय घेतला, असे आयफेल टॉलर प्रशासनाने सांगितले. (वृत्तसंस्था)