बगदाद आंतरराष्ट्रीय विमानतळावर रॉकेट हल्ला; आठ जणांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: January 3, 2020 07:24 AM2020-01-03T07:24:59+5:302020-01-03T08:05:12+5:30
बगदाद आंतरराष्ट्रीय विमानतळावर रॉकेट हल्ला झाला आहे.
इराक - बगदाद आंतरराष्ट्रीय विमानतळावर रॉकेट हल्ला झाला आहे. या हल्ल्यात आठ जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहे. काही जण गंभीर जखमी असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बगदाद आंतरराष्ट्रीय विमानतळावर शुक्रवारी (3 जानेवारी) रॉकेट हल्ला झाला आहे. तीन रॉकेटचा हल्ला करण्यात आल्याने या ठिकाणी वाहनांना आग लागली. यामध्ये काही टॉप कमांडरचा मृत्यू झाला असून अनेक सैनिक जखमी झाले आहेत. टॉप कमांडर जनरल कासिम सोलेमानी यांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. बगदादमध्ये अमेरिकेच्या दूतावासावर इराण समर्थक मिलिशियाकडून नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला हल्ला करण्यात आला होता. अमेरिकेसोबत तणाव निर्माण झाल्यानंतर हा हल्ला करण्यात आला होता.
Eight killed in rocket attack on Baghdad airport in Iraq according to security sources: AFP news agency
— ANI (@ANI) January 3, 2020
#UPDATE Deputy head of Iraq's Hashed al-Shaabi military force killed in airport attack: AFP news agency quotes officials https://t.co/uJX0gnyZjE
— ANI (@ANI) January 3, 2020
Iraqi state TV says top Iran commander Qasem Soleimani killed in Baghdad attack: AFP news agency
— ANI (@ANI) January 3, 2020
Hashed military force says 'US strike' killed top Iran, Iraq commanders at Baghdad airport: AFP news agency https://t.co/CtJiIKIjmbpic.twitter.com/3OXuNa2PzQ
— ANI (@ANI) January 3, 2020
Gen. Qassim Soleimani, head of Iran's elite Quds force, has been killed in an airstrike at Baghdad's airport. Strike also killed Abu Mahdi al-Muhandis, deputy commander of militias known as Popular Mobilization Forces. PMF blamed United States for the airstrike: Associated Press
— ANI (@ANI) January 3, 2020