आठ लाख भारतीयांना कुवेत सोडावे लागण्याची शक्यता
By ऑनलाइन लोकमत | Published: July 7, 2020 04:04 AM2020-07-07T04:04:00+5:302020-07-07T04:05:03+5:30
‘गल्फ न्यूज’ वृत्तपत्राने दिलेल्या वृतानुसार कुवेत संसदेच्या कायदेविषयक समितीने अशा कायद्याचा मसुदा तयार केला असून त्याआधारे कायदा करण्यास संसदेच्या अध्यक्षांनी अनुकूलता दर्शविली आहे.
दुबई : कुवेतमध्ये नोकरी-धंद्यानिमित्त राहणाऱ्या विदेशी नागरिकांची संख्या कमी करण्यासाठी एक कायदा करण्याचा विचार सुरू असून तो मंजूर झाला तर तेथे राहणाºया एकूण १४.५ लाख भारतीयांपैकी सुमारे आठ लाख जणांना कुवेत सोडावे लागण्याची शक्यता आहे.
‘गल्फ न्यूज’ वृत्तपत्राने दिलेल्या वृतानुसार कुवेत संसदेच्या कायदेविषयक समितीने अशा कायद्याचा मसुदा तयार केला असून त्याआधारे कायदा करण्यास संसदेच्या अध्यक्षांनी अनुकूलता दर्शविली आहे. या प्रस्तावित कायद्यात कुवेतमध्ये भारतीयांची संख्या एकूण लोकसंख्येच्या १५ टक्के एवढी मर्यादित करण्याचा विचार आहे.
कुवेतची सध्याची एकूण लोकसंख्या ४३ लाख आहे. त्यात फक्त १३ लाख कुवेती नागरिक आहेत व बाकीचे ३० लाख विदेशी नागरिक आहेत. त्यात भारतीयांची संख्या सर्वाधिक म्हणजे १४.५ लाख आहे. तेलाच्या घसरत्या किमती व त्यात कोरोना महामारी आल्याने कुवेतची अर्थव्यवस्था नाजूक अवस्थेत आहे.
काही ठळक आकडेवारी
१४.५ लाख कुवेतमधील एकूण भारतीय
२८ हजार त्यापैकी सरकारी नोकरीत
५.२३ लाख खासगी नोकरीत
१.१६ लाख कुटुंबीय
६० हजार त्यापैकी विद्याथी
कुठे किती भारतीय?
१ लाख ६० हजार
भारतीय सौदी अरबमध्ये सध्या
काम करत आहेत.
भारतीय कामगार आहेत.
सर्वाधिक कामगार केरळातील आहेत. वर्ल्ड बँकेच्या आकडेवारीनुसार, भारत दरवर्षी स्थलांतरीत कामगारांच्या माध्यमातून
८३ बिलियन डॉलरचे
विदेशी धन प्राप्त करतो.