युरोपात ३० वर्षांत घटले तब्बल ४२ कोटी पक्षी

By Admin | Published: November 4, 2014 02:06 AM2014-11-04T02:06:50+5:302014-11-04T02:06:50+5:30

गेल्या ३० वर्षांत युरोपात पक्ष्यांच्या संख्येत धक्कादायक पद्धतीने घट नोंदली गेली आहे.

Eighty-four million birds fall in Europe in 30 years | युरोपात ३० वर्षांत घटले तब्बल ४२ कोटी पक्षी

युरोपात ३० वर्षांत घटले तब्बल ४२ कोटी पक्षी

googlenewsNext

लंडन : गेल्या ३० वर्षांत युरोपात पक्ष्यांच्या संख्येत धक्कादायक पद्धतीने घट नोंदली गेली आहे. चिमणी, भारद्वाज आणि तितर यासारख्या सर्वत्र आढळत असलेल्या पक्ष्यांच्या नैसर्गिक निवाऱ्यावर मानवी घाला आल्याने ही घट झाली आहे. तथापि, काही दुर्मिळ पक्ष्यांच्या संख्येत मात्र वाढ झाल्याचे एका संशोधनातून पुढे आले आहे.
विज्ञानाशी निगडित ‘इकॉलॉजी लेटर्स’ या नियतकालिकात प्रकाशित एका शोधनिबंधाच्या मते, युरोपात गेल्या ३ दशकांत सर्वत्र आढळत असलेल्या व प्रमुख ३६ पक्ष्यांच्या प्रजाती धोक्यात आल्या आहेत. यात चिमणी, साळुंकी, तितर, भारद्वाज यासारख्या पक्ष्यांचा समावेश आहे. प्रत्येक देश, खंड यानुसार आढळ असलेल्या पक्ष्यांच्या संरक्षणासाठी तात्काळ उपाययोजना अमलात आणण्याच्या गरजेवर यात भर देण्यात आला आहे. दरम्यान, पक्ष्यांच्या संख्येत ही घट नोंदली असली तरी हे काही पक्ष्यांबाबतच खरे असल्याचे या अभ्यासात स्पष्ट करण्यात आले आहे.
या अभ्यासात सहभागी असलेले आणि पक्ष्यांच्या सुरक्षेसाठी काम करत असलेल्या रॉयल सोसायटीचे रिचर्ड ग्रेगोरी यांनी सांगितले की, युरोपातील पक्षी जीवनासाठी ही धोक्याची घंटा आहे. यावरून आम्ही ज्या पद्धतीने पर्यावरण रक्षण करत आहोत त्यामुळे पक्ष्यांच्या अनेक प्रजातींना मोठा धोका निर्माण झाला आहे. शास्त्रज्ञांच्या मते, पक्ष्यांच्या संख्येत घट झाल्यास मानवी समाजच संकटात येऊ शकतो. या समस्येवर तात्काळ तोडगा काढण्याची गरज आहे, असे पक्षीतज्ज्ञ रिचर्ड इन्गेर यांनी नमूद केले. सर्व पक्षी व त्यांचे नैसर्गिक निवारे यांचे संरक्षण व कायदेशीर संरक्षणाची व्यवस्था निर्माण करण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत.
पक्ष्यांच्या लोकसंख्येशी निगडित या अभ्यासात २५ देशांतील युरोपीय पक्ष्यांच्या १४४ प्रजातींचा समावेश करण्यात आला.
उपाययोजना
शहरी भागात मोठ्या प्रमाणावर वृक्ष लागवड करणे, पर्यावरणस्न्ोही कृषी योजनांना प्रोत्साहन, कायदेशीर संरक्षण, नैसर्गिक निवारे, मोठी आर्थिक तरतूद आहे. (वृत्तसंस्था)

Web Title: Eighty-four million birds fall in Europe in 30 years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.