मॅन्चेस्टर हल्लेखोराचे वडील-भाऊदेखील ताब्यात
By Admin | Published: May 25, 2017 08:42 AM2017-05-25T08:42:32+5:302017-05-25T08:45:22+5:30
मॅन्चेस्टर स्फोटाप्रकरणी पोलिसांनी सलमान आबेदीचे वडील व भावाला ताब्यात घेतले आहे.
ऑनलाइन लोकमत
लंडन, दि. 25 - मॅन्चेस्टरमध्ये सोमवारी रात्री अमेरिकी पॉप स्टार एरियाना ग्रांदे हिच्या संगीताच्या कार्यक्रमातून हजारो लोक बाहेर पडत असताना इसिसने घडवलेल्या आत्मघाती स्फोटासंबंधित आरोपींचा छडा लावण्यासाठी पोलीस अथक प्रयत्न करत आहेत. याप्रकरणी पोलिसांनी सातव्या संशयित व्यक्तीला ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वॉरविकशायरमधील न्यूनिएटन येथे तपासणी केल्यानंतर एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे.
मॅन्चेस्टरमध्ये सोमवारी रात्री अमेरिकी पॉप स्टार एरियाना ग्रांदे हिच्या संगीताच्या कार्यक्रमातून हजारो लोक बाहेर पडत असताना इसिसने घडवलेल्या आत्मघाती 22 जणांचा मृत्यू झाला होता तर 59 जण जखमी झालेत. या कार्यक्रमासाठी तरुण व किशोरवयीन मुले मोठ्या प्रमाणात आली होती. शो संपल्यावर एरियाना ही स्टेजवरून गेल्यानंतर हा स्फोट झाला.
या स्फोटात ठार झालेल्या आत्मघाती हल्लेखोराचे नाव सलमान अबेदी असे होते व तो 22 वर्षांचा होता, असे मॅन्चेस्टर पोलिसांनी मंगळवारी रात्री जाहीर केले. तर दुसरीकडे लीबियामध्ये सलमानचे वडील आणि भावालाही ताब्यात घेण्यात आल्याचे वृत्त आहे.
या स्फोटाप्रकरणी बुधवारी पोलिसांनी विगनमध्ये पाचव्या व्यक्तीला ताब्यात घेतले होते. यापूर्वी लंडनमध्ये 7 जुलै 2005 मध्ये दहशतवादी हल्ला झाला होता. मध्य लंडनमध्ये त्यावेळी साखळी स्फोट घडवून आणण्यात आले होते. यात 52 जणांचा मृत्यू झाला होता तर 700 हून अधिक नागरिक जखमी झाले होते. सोमवारी झालेल्या स्फोटाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून ब्रिटनमध्ये संवेदनशील ठिकाणांवर पोलिसांसहीत सैनिकदेखील तैनात करण्यात आले आहेत.
सलमान आबेदीचा भाऊ हाशिम आबेदी ताब्यात
कोण होता हल्लेखोर ?
मिळालेल्या माहितीनुसार, मॅन्चेस्टरमधील लीबियन कुटुंबात जन्मलेला सलमान आबदी (22 वर्ष) सेलफॉर्ड युनिर्व्हसिटीचा माजी विद्यार्थी होता. मॅन्चेस्टर मेट्रोपॉलिटन युनिर्व्हसिटीसोबत संबंधित असलेल्या हामिद-अल-सैद यांनी सांगितले की, सलमानचे त्याच्या कुटुंबीयांसोहत चांगले संबंध नव्हते. त्याचे कुटुंबीय त्याला योग्य वळणावर आणण्यासाठी प्रयत्न करत राहिले, मात्र त्यांना यश आले नाही.