चीनच्या पंतप्रधानपदी ली कियांग यांची निवड
By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2023 06:01 AM2023-03-12T06:01:59+5:302023-03-12T06:02:21+5:30
चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांचे विश्वासू ली कियांग यांची पंतप्रधानदावर निवड करण्यात आली आहे.
बीजिंग: चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांचे विश्वासू ली कियांग यांची पंतप्रधानदावर निवड करण्यात आली आहे. त्यांनी पद आणि गाेपनीयतेची शपथ घेतली. चीनच्या सत्ताकारणात कियांग हे जिनपिंग यांच्यानंतर दुसऱ्या क्रमांकाचे नेते आहेत. कियांग यांना २ हजार ९३६ मते मिळाली, तर ३ जणांनी त्यांच्या विराेधात मतदान केले.
चीनच्या शून्य काेविड धाेरणावर जगभर टीका झाली हाेती. हे धाेरण तयार करणे आणि त्याची अंमलबजावणी करण्यामागे कियांग यांचीच भूमिका हाेती. हे धाेरण पूर्णपणे अपयशी ठरले हाेते. लाेकांना त्यांनी घरातच डांबून ठेवले हाेते.
अखेर शेकडाे नागरिकांनी रस्त्यावर उतरून विराेध केला हाेता. मात्र, जिनपिंग यांच्याशी अतिशय घनिष्ठ संबंध असल्यामुळे त्यांना पंतप्रधान बनविण्यात आले आहे. काही आठवड्यांपूर्वी ते चीनच्या टाॅप ७ नेत्यांमध्येही नव्हते. (वृत्तसंस्था)
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"