पाकिस्तान निवडणूक, दहशतवादी हाफिज सईदने केलं मतदान
By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2018 09:10 AM2018-07-25T09:10:26+5:302018-07-25T09:12:22+5:30
पाकिस्तानमध्ये आज पंतप्रधान पदाच्या निवडणुकांसाठी मतदानाला सुरुवात झाली आहे. पाकिस्तानी क्रिकेट संघाचे माजी कर्णधार आणि तहरीक ए इन्साफ पक्षाचे प्रमुख इम्रान खान यांनी पंतप्रधानपदासाठी उमेदवारी दाखल केली आहे.
इस्लामाबाद - पाकिस्तानमध्ये आज पंतप्रधान पदाच्या निवडणुकांसाठी मतदानाला सुरुवात झाली आहे. पाकिस्तानी क्रिकेट संघाचे माजी कर्णधार आणि तहरीक ए इन्साफ पक्षाचे प्रमुख इम्रान खान यांनी पंतप्रधानपदासाठी उमेदवारी दाखल केली असून त्यांचेच नाव आघाडीवर आहे. त्यासाठी इम्रान खान यांनी तब्बल 5 जागेंवरुन उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. या निवडणुकांसाठी लष्कर ए तोएबाचा म्होरक्या हाफिज सईदनेही मतदान केले.
पाकिस्तान तहरीक ए इन्साफ पक्षाचे प्रमुख आणि पंतप्रधान पदाचे उमेदवार इम्रान खान यांनी पाकिस्तानच्या पंबाज प्रांतमधील कराची, लाहोर आणि रावळपिंडी या 3 ठिकाणांहून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. याशिवाय खैबर पख्तूनख्वा आणि सिंध प्रांतमधूनही प्रत्येकी एक-एक मतदारसंघातूनही ते नशिब आजमावत आहेत. पाकिस्तानच्या निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, नॅशनल असेम्ब्लीच्या २७२ जागा ३,४५९ उमेदवार लढवत असून चार प्रांतीय असेम्ब्लींच्या ५७७ सर्वसाधारण जागा ८,३९६ उमेदवार लढवत आहेत. देशात १०५.९६ दशलक्ष मतदारांची नोंद आहे. देशभर मतदानासाठी तीन लाख ७० हजार लष्करी जवान तैनात करण्यात आले आहेत. देशाच्या इतिहासात प्रथमच मतदानासाठी एवढ्या मोठ्या संख्येने लष्कर तैनात केले गेले आहे.
इम्रान खान दावेदार
पाकिस्तानमधील सार्वत्रिक निवडणुकीत यावेळी शाहबाझ शरीफ ( पीएमएल -एन) इम्रान खान (पीटीआय) आणि बिलावल भुत्तो (पीपीपी) हे नेते रिंगणात आहेत. नवाझ शरीफ यांना पंतप्रधानपदावरून पायउतार व्हावे लागल्यानंतर सत्तासुत्रे हाती घेणाऱ्या शाहबाझ शरीफ यांनी आपल्या उत्तम प्रशासकीय कौशल्याची चुणूक दाखवली. मात्र त्यांचे नेतृत्व तितकेसे प्रभावी नाही. तर बिलावल भुत्तो राजकारणात नवखे आहेत. त्यामुळे इम्रान खान याचेच या निवडणुकीत पारडे जर राहण्याची शक्यता आहे.
लष्कर ए तोएबाचा म्होरक्या हाफिज सईदने केले मतदान
Lashkar-e-Taiba chief and Mumbai 26/11 attacks mastermind Hafiz Saeed casts his vote at a polling booth in Lahore. #PakistanElections2018pic.twitter.com/nKdXt3kQZA
— ANI (@ANI) July 25, 2018