भारत-बांगलादेशात विद्युत भागीदारी
By admin | Published: May 16, 2015 12:43 AM2015-05-16T00:43:18+5:302015-05-16T00:43:18+5:30
भारत आणि बांगलादेशामध्ये सरकारी स्तरावरील सहकार्याशिवाय वीज निर्मितीसाठी खासगी क्षेत्रात भागीदारीवर सहमती झाली आहे.
ढाका : भारत आणि बांगलादेशामध्ये सरकारी स्तरावरील सहकार्याशिवाय वीज निर्मितीसाठी खासगी क्षेत्रात भागीदारीवर सहमती झाली आहे.
भारत आणि बांगलादेशच्या वीज सचिवांची दोन दिवसांची येथे बैठक झाली. या दोन्ही देशांमध्ये वीज क्षेत्रात भागीदारी आणि विजेची देवाणघेवाण यावर सहमती झाली आहे, असे बांगलादेशच्या ऊर्जा विभागाच्या प्रवक्त्याने सांगितले. दोन सरकारी संस्थांमध्ये जशी भागीदारी असते अगदी तशाच स्वरूपाची खासगी क्षेत्रातील भागीदारी असेल, असे भारताच्या भारतीय प्रतिनिधी मंडळाचे प्रमुख वीज सचिव पी. के. सिन्हा यांनी सांगितले.
हे सहकार्य भारतात किंवा बांगलादेशात होऊ शकते. गेल्या सहा महिन्यांतील ही सहावी बैठक होती. बांगलादेशातील वीज क्षेत्रात खासगी भागीदारीचा प्रस्ताव भारताकडून मांडण्यात आला. याआधी बांगलादेशातील वीज क्षेत्रात गुंतवणूक करण्याची इच्छा रिलायन्ससह अन्य भारतीय कंपन्यांनी व्यक्त केली होती. नेपाळ आणि भूतानकडील वीज भारतामार्गे आणण्याच्या प्रश्नासह आम्ही आमच्या वीज क्षेत्रात गुंतवणुकीची भारतीय कंपन्यांची इच्छा यावर चर्चा केली. नेपाळ आणि भूतानमधून भारतामार्गे वीज आयात करण्यात येणार आहे.