पृथ्वीमुळे चंद्रावर बनतंय पाणी...; Chandrayaan-1 च्या डेटामधून झाला नवा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2023 02:24 PM2023-09-15T14:24:59+5:302023-09-15T14:26:03+5:30

सौर वाऱ्यामध्ये हाय एनर्जीचे कण जसे प्रोटॉन, इलेक्ट्रॉन इ. ते चंद्राच्या पृष्ठभागावर वेगाने हल्ला करत राहतात.

Electrons in the Earth's magnetosphere could be forming water on the Moon | पृथ्वीमुळे चंद्रावर बनतंय पाणी...; Chandrayaan-1 च्या डेटामधून झाला नवा खुलासा

पृथ्वीमुळे चंद्रावर बनतंय पाणी...; Chandrayaan-1 च्या डेटामधून झाला नवा खुलासा

googlenewsNext

चंद्रयान १ नं चंद्रावर पाणी शोधलं होतं. याचा खुलासा खूप वर्षापूर्वी झाला होता. परंतु आता नवीन बाब समोर आली आहे. पृथ्वीमुळे चंद्रावर पाणी बनलं होतं. कारण याठिकाणाहून जाणारी हाय एनर्जी इलेक्ट्रॉन्स चंद्राच्या पृष्ठभागावर पाणी बनण्यास मदत करत आहेत असा वैज्ञानिकांनी दावा केला आहे. अमेरिकेतील मनोवामध्ये स्थित हवाई यूनिवर्सिटीच्या वैज्ञानिकांनी हा खुलासा केला आहे.

या स्टडीत समोर आले की, पृथ्वीच्या चौफेर असलेल्या प्लाझ्माच्या शीटमुळे चंद्राचे दगड वितळतात किंवा तुटतात त्यातून खनिज निर्माण होते अथवा ते बाहेर येते. याशिवाय चंद्राचा पृष्ठभाग आणि वातावरणातील हवामानही सतत बदलत असते. ही स्टडी नेचर एस्ट्रोनॉमी जर्नलमध्ये प्रकाशित झाली आहे. ज्यात म्हटलंय की, इलेक्टॉन्समुळे चंद्राच्या पृष्ठभागावर पाणी बनतंय. चंद्रावर पाणी कुठे आहे आणि किती प्रमाणात आहे याची पृथ्वीवर असणाऱ्या वैज्ञानिकांना कल्पना नाही. हे शोधणेही अवघड आहे. त्यामुळे चंद्रावरील पाण्याचा स्त्रोतचे कारण समजत नाही असं सांगितले आहे.

जर चंद्रावर पाणी कसे आणि कुठे मिळेल, अथवा किती लवकर पाणी बनवलं जाईल हे समजलं तर भविष्यात त्याठिकाणी मानवी वस्ती बनवण्यास मदत मिळेल. चंद्रयान १ च्या एका यंत्राने चंद्राच्या पृष्ठभागावर पाण्याचे कण पाहिले होते. हे भारताचे पहिलं चंद्र मिशन होते. चंद्र आणि पृथ्वी दोघेही सौर वाऱ्याच्या परिघात आहेत. सौर वाऱ्यामध्ये हाय एनर्जीचे कण जसे प्रोटॉन, इलेक्ट्रॉन इ. ते चंद्राच्या पृष्ठभागावर वेगाने हल्ला करत राहतात. त्यांच्यामुळेच चंद्राच्या पृष्ठभागावर पाणी तयार होत असल्याचे शास्त्रज्ञांचे मत आहे. चंद्रावरील बदलत्या हवामानामागील कारण म्हणजे जेव्हा सौर वारा पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्रातून जातो तेव्हा तो चंद्राचे संरक्षण करतो.

परंतु सूर्यापासून उत्सर्जित होणाऱ्या प्रकाश फोटॉनपासून चंद्राचे संरक्षण करणे पृथ्वीला शक्य नाही. असिस्टेंट रिसर्चर शुआई ली यांनी सांगितले की, आम्हाला चंद्रावर एक नैसर्गिक प्रयोगशाळा सापडली आहे. आम्ही या प्रयोगशाळेतूनच त्याचा अभ्यास करतो. येथून आम्ही चंद्राच्या पृष्ठभागावर पाणी तयार होण्याच्या प्रक्रियेचा अभ्यास करत आहोत. जेव्हा चंद्र पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्राच्या किंवा मॅग्नेटोटेलच्या बाहेर असतो तेव्हा सूर्याच्या उष्ण वाऱ्यांचा त्याच्यावर जास्त हल्ला होतो.

पृथ्वीच्या मॅग्नेटोटेलचा चंद्रावर मोठा प्रभाव

जेव्हा ते मॅग्नेटोटेलच्या आत असते तेव्हा त्यावर सौर वाऱ्यांचा क्वचितच हल्ला होतो. अशा स्थितीत पाण्याच्या निर्मितीची प्रक्रिया थांबते. शुआई ली आणि त्यांचे सहकारी चंद्रयान-१ च्या मून मिनरॉलॉजी मॅपर उपकरणाच्या डेटाचे विश्लेषण करत होते. २००८ ते २००९ या कालावधीतील डेटाचे त्यांनी विश्लेषण केले आहे. पृथ्वीच्या मॅग्नेटोटेलमुळे, चंद्रावर पाणी तयार होण्याची प्रक्रिया वेगवान किंवा मंद होते. याचा अर्थ चंद्रावर पाणी तयार होण्याच्या प्रक्रियेत मॅग्नेटोटेलचा थेट सहभाग नाही. पण त्याचा खोलवर परिणाम होतो. सौर वाऱ्यांमधून येणार्‍या हाय एनर्जी प्रोटॉन-इलेक्ट्रॉनच्या प्रभाव त्यावर असतो.

Web Title: Electrons in the Earth's magnetosphere could be forming water on the Moon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Waterपाणी