बायडेन यांचा गैरसमज आहे, की त्यांना देशात परिवर्तनासाठी निवडण्यात आले; पण..., Musk यांचा टोला
By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2022 12:26 PM2022-05-13T12:26:31+5:302022-05-13T12:31:24+5:30
बायडेन यांचा गैरसमज आहे, की त्यांना देशात परिवर्तन घडविण्यासाठी निवडण्यात आले, पण
टेस्लाचे सीईओ (Tesla CEO) इलॉन मस्क (Elon Musk) यांनी अमेरिकेचे राष्ट्रपती ज्यो बायडेन (US President Joe Biden) यांच्याव थेट निशाणा साधला आहे. "सर्वांना कमी नाटक हवे होते, म्हणून बायडेन यांची अमेरिकेचे राष्ट्रपती म्हणून निवड करण्यात आली. मात्र, त्यांना देशात सुदारणा करण्यासाठी निवडण्यात आले, असा त्यांचा गैरसमज आहे," असे इलॉन मस्क यांनी म्हटले आहे.
"बायडेन यांचा गैरसमज आहे, की त्यांना देशात परिवर्तन घडविण्यासाठी निवडण्यात आले आहे. पण, सर्वांनाच कमी ड्रामा हवा होता, म्हणून त्यांना निवडण्यात आले," असे ट्विट इलॉन मस्क यांनी केले आहे. इलॉन मस्क हे लवकरच 44 बिलियन डॉलरमध्ये ट्विटर टेकओव्हर करत आहेत. एवढेच नाही, तर ट्विटरकडून माजी राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर लादण्यात आलेली बंदीही आपण उठवणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
Biden’s mistake is that he thinks he was elected to transform the country, but actually everyone just wanted less drama
— Elon Musk (@elonmusk) May 12, 2022
2024 साठी कमी ध्रुविकरण करणारा उमेदवारच ठीक असेल, असे ट्विटही इलॉन मस्क यांनी केले आहे. ट्रम्प यांनी पुन्हा एकदा ट्विटरवर यावे, असेही त्यांना वाटते. डोनाल्ड ट्रम्प यांचे ट्विटर अकाउंट गेल्यावर्षी सस्पेंड करण्यात आले होते.
Even though I think a less divisive candidate would be better in 2024, I still think Trump should be restored to Twitter
— Elon Musk (@elonmusk) May 12, 2022