श्वानाच्या लोगोमुळे Elon Musk यांना मोठा झटका; अवघ्या चार दिवसांत 1.30 लाख कोटी बुडाले
By ऑनलाइन लोकमत | Published: April 7, 2023 02:21 PM2023-04-07T14:21:46+5:302023-04-07T14:53:53+5:30
इलॉन मस्क यांनी ट्विटरचा लोगो म्हणून Dogecoin लावल्यानंतर त्यांना मोठा तोटा सहन करावा लागला आहे.
Elon Musk Dogecoin : इलॉन मस्क यांनी नेहमीच डोगेकॉइनचे(Dogecoin) समर्थन केले आहे. जेव्हा-जेव्हा त्यांनी डॉगेकॉइनच्या समर्थनार्थ ट्विट केले, तेव्हा या क्रिप्टोकरन्सीचे नशीब उजळते. यावेळी इलॉन मस्क यांनी ट्विटरच्या लोगोमध्ये चिमणीऐवजी Dogecoin चा कुत्रा वापरुन खळबळ उडवून दिली. आता परत त्यांनी लोगोमध्ये पक्षी आणला आहे. पण, त्यांना हा निर्णय चांगलाच महागाड पडलाय.
Dogecoin मुळे 1.30 लाख कोटी रुपये बुडाले
3 एप्रिल रोजी त्यांनी ट्विटरचा लोगो बदलण्याचा निर्णय घेतला आणि त्याच दिवशी इलॉन मस्क यांना 75 हजार कोटी रुपयांचा फटका बसला. तेव्हापासून इलॉन मस्क यांना सातत्याने नुकसान सहन करावे लागत आहे. 3 एप्रिल ते 6 एप्रिलदरम्यान इलॉन मस्क यांनी $16 अब्ज गमावले आहेत. 3 एप्रिल रोजी मस्क यांना $ 9 अब्जांपेक्षा जास्त नुकसान झाले. त्यानंतर आतापर्यंत आणखी 7 अब्ज डॉलर्सचे नुकसान झाले आहे. भारतीय चलनात ही रक्कम 1.30 लाख कोटी होते. म्हणजेच, Dogecoin च्या कुत्र्यामुळे अवघ्या 4 दिवसांत मस्क यांना इतका फटका बसला आहे.
यावर्षी 25 टक्के वाढ झाली
इलॉन मस्क यांना 6 एप्रिल रोजी $298 मिलियनचो तोटा झाला आहे, ज्यामुळे त्यांची संपत्ती 171 अब्ज डॉलर्सची आली आहे. तसेच, या वर्षी त्यांच्या एकूण संपत्तीत 25 टक्क्यांनी वाढ झाली आहे. याचा अर्थ 2023 मध्ये त्यांची एकूण संपत्ती $34.5 अब्जाने वाढली. सध्या ते जगातील दुसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत उद्योगपती आहेत. फ्रेंच उद्योगपती बर्नार्ड अर्नॉल्ट त्यांच्या पुढे आहेत. त्यांची एकूण संपत्ती 195 अब्ज डॉलर्स आहे.