Elon Musk: इलॉन मस्क यांना जीवाचा धोका; म्हणाले- 'माझी कधीही हत्या होऊ शकते...'
By ऑनलाइन लोकमत | Published: December 6, 2022 07:14 PM2022-12-06T19:14:56+5:302022-12-06T19:15:22+5:30
जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती इलॉन मस्क बऱ्याच दिवसांपासून चर्चेत आहेत.
Elon Musk: सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरचे नवीन मालक आणि जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती इलॉन मस्क (Elon Musk) हे बऱ्याच दिवसांपासून चर्चेत आहेत. आता त्यांनी धक्कादायक विधान केले आहे. मस्क यांनी त्यांच्या जीवाला धोका असल्याचे धक्कादायक विधान केले आहे. त्यांच्या या विधानामुळे एकच खळबळ उडाली आहे.
काय म्हणाले मस्क?
Elon Musk Says His Assassination Risk is “Quite Significant”: “Frankly the risk of something bad happening to me or literally being shot is quite significant. I am definitely not going to be doing any open-air car parades.”
— Wittgenstein (@backtolife_2023) December 4, 2022
Source: https://t.co/thJ94gap7bpic.twitter.com/P4vQ2gTQZz
ट्विटर स्पेसवर 2 तासांच्या ऑडिओ चॅटमध्ये मस्क म्हणाले की, 'माझ्यासोबत काहीतरी वाईट घडण्याचा किंवा मला गोळी लागण्याचा मोठा धोका आहे. एखाद्याला मारायचे असेल तर ते इतके अवघड काम नाही. मला आशा आहे की माझ्या बाबतीत असे काहीही होणार नाही. पण, मी उघड्या गाडीत नक्कीच फिरू शकत नाही.'
मस्क पुढे म्हणाले की, 'आपल्याला असे भविष्य हवे आहे, जिथे आपल्यावर अत्याचार होणार नाहीत. जिथे आपले बोलणे रोखले जाणार नाही. जोपर्यंत तुम्ही इतर कोणाचे नुकसान करत नाही, तोपर्यंत तुम्हाला काय म्हणायचे आहे ते सांगण्याची परवानगी दिली पाहिजे.' दरम्यान, ट्विटर ताब्यात घेतल्यापासून इलॉन मस्क हे अनेकदा त्यांच्या वक्तव्यांमुळे चर्चेत आहेत.