एलन मस्क यांची मोठी घोषणा! तिसऱ्या महायुद्धाआधी मंगळावर मानवीवस्ती तयार करणार
By ऑनलाइन लोकमत | Published: February 10, 2021 06:20 PM2021-02-10T18:20:31+5:302021-02-10T18:29:11+5:30
Elon Musk Mars Mission: एलन मस्क यांना मंगळावर १० लोकांना घेऊन जायचंय.
जगाला तिसऱ्या महायुद्धाला सामोरं जावं लागू शकतं असं जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आणि स्पेसएक्स (spaceX) कंपनीचे मालक एलन मस्क (Elon Musk) यांचं म्हणणं आहे. पण त्याआधीच मंगळ ग्रहावर मानवीवस्ती तयार झालेली असेल आणि तिथं सर्वजण गुण्यागोविंदानं नांदतील, असा दावा मस्क यांनी केला आहे. मार्स सोसायटी व्हर्च्युअल कंव्हेंशनमध्ये (Mars Society Virtual Convention) बोलत असताना एलन मस्क यांनी मंगळग्रहावर सर्व गोष्टी ऑटोमॅटीक ओपरेट होतील, असाही दावा केला आहे. दरम्यान, मस्क यांनी २०२६ साली मंगळावर मानव पोहोचलेला असेल असं याआधीच जाहीर करुन टाकलं आहे. तर दुसरीकडे अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था नासानं २०३३ सालापर्यंत मंगळावर मानवाला पाठविण्याचं लक्ष्य ठेवलं आहे. (elon musk mars mission)
"आपल्याला जर मंगळावर मानवीवस्ती निर्माण करायची असेल तर तिथं सारंकाही ऑटोमॅटीक पद्धतीनं सूचना देता येऊ शकतील अशाप्रकारचं तंत्र विकसीत करावं लागेल. केवळ एका जागेवर किंवा एका मर्यादेपर्यंतच लोकवस्ती वसविण्यापेक्षा संपूर्ण एक शहर निर्माण करण्याच्या दृष्टीकोनातून आपण विचार करायला हवा. पृथ्वीवर काही कारणास्तव ठराविकवेळेनंतर आवश्यक गोष्टींची कमतरता भासू लागली तर आपला विनाश होऊ शकतो. त्यामुळे आपल्याला नवं सुरक्षित ठिकाण शोधण्याची आवश्यकता आहे. तसं ते कुठं उपलब्ध आहे का याचाही शोध घेण्यासाठीचा प्रयत्न करायला हवा", असं एलन मस्क म्हणाले.
मुकेश अंबानींच्या Reliance Jio ची बादशाही धोक्यात; जगज्जेत्या अब्जाधीशाची कंपनी येतेय
तिसऱ्या महायुद्धाआधी आपण मंगळावर पोहोचलेले असू का? या प्रश्नाच्या उत्तरात एलन मस्क यांनी महत्वाची माहिती दिली. "जगाला तिसऱ्या महायुद्धाला सामोरं जावं लागू नये, असंच मला वाटतं. पण तसं जर काही झालंच तर मंगळावर आपलं दुसरं विश्व निर्माण करण्याच्या स्वप्नांना मोठा धक्का बसू शकतो. त्यामुळे तिसरं महायुद्ध होण्याआधीच आपल्याला मंगळावर मानवी वस्तीची निर्मिती करावी लागेल", असं मस्क म्हणाले.
'स्टारशिप स्पेसक्राफ्ट'च्या मदतीनं मंगळावर पहिलं पाऊल ठेवलं जाणार
मंगळ ग्रहावर १० लाख लोकांना घेऊन जाण्याचा जगातील सर्वात श्रीमंत व्यक्त एलन मस्क यांचा इरादा आहे. यासाठी त्यांच्या spaceX कंपनीकडून तयार केल्या जाणाऱ्या १ हजार 'स्टारशिप स्पेसक्राफ्ट'ची मदत घेण्यात येणार आहे. सध्या स्टारशिपच्या निर्मितीच्या पहिल्या टप्पातलं काम सुरू आहे. एलन मस्क यांनी गेल्याच वर्षी मानवाला मंगळावर पोहोचविण्याचं स्वप्न असल्याचं म्हटलं होतं. विशेष म्हणजे, या प्रवासात कोणताही भेदभाव न करता लोकांना मंगळावर जाता येईल. लोकांना कर्ज काढूनही मंगळापर्यंतचा प्रवास करता येईल, असंही मस्क यांनी म्हटलं होतं.