Elon Musk: गुगलच्या सहसंस्थापकाचाही संसार मोडला; एलन मस्क यांचे नाव आले, पत्नीशी अफेअर?

By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2022 01:52 PM2022-07-26T13:52:18+5:302022-07-26T13:52:34+5:30

मस्क यांची प्रेम प्रकरणे आणि अनैतिक संबंध जगविख्यात आहेत. टेस्लाच्या एका महिला अधिकाऱ्यालाही मस्क यांच्यापासून दोन जुळी मुले आहेत. असे असताना मस्क आता वेगळ्याच प्रकरणात चर्चेत आले आहेत.

Elon Musk Rejects Allegations of Affair With Sergey Brin's Wife Nicole Shanahan after divorce Case | Elon Musk: गुगलच्या सहसंस्थापकाचाही संसार मोडला; एलन मस्क यांचे नाव आले, पत्नीशी अफेअर?

Elon Musk: गुगलच्या सहसंस्थापकाचाही संसार मोडला; एलन मस्क यांचे नाव आले, पत्नीशी अफेअर?

Next

टेस्लाचे सीईओ एलन मस्क यांच्या कारनाम्यांमुळे गुगलच्या सह संस्थापकाचा संसार मोडल्याचे वृत्त आहे. सर्गेई ब्रिन यांची पत्नी निकोल शनहान हिच्याशी मस्क यांचे लफडे होते, अशा चर्चा जोर धरू लागल्या होत्या. तितक्यातच ब्रिन यांनी पत्नीला घटस्फोट देण्यासाठी अर्ज केल्याने खळबळ उडाली आहे. यावर मस्क यांच्याकडून प्रतिक्रिया आली आहे. 

मस्क यांची प्रेम प्रकरणे आणि अनैतिक संबंध जगविख्यात आहेत. टेस्लाच्या एका महिला अधिकाऱ्यालाही मस्क यांच्यापासून दोन जुळी मुले आहेत. एवढेच नाही तर मस्क यांच्या वडिलांची या वयात सावत्र मुलीपासून दोन मुले आहेत. मस्क यांचे स्पर्म देखील दान करण्यासाठी काही संस्थांनी मागणी केली आहे. अशा या मस्क घराण्याच्या पराक्रमांमुळे आता गुगलच्या सह संस्थापकाचा संसार धोक्यात आला आहे. 

यावर एलन मस्क यांनी माझे सर्गेई ब्रिन यांच्या पत्नीशी अफेअर नव्हते. या सर्व खोट्या गोष्टी आहेत. कालच्याच रात्री सर्गेई आणि मी एका पार्टीत एकत्र होतो. तिच्या पत्नीशी माझा कोणत्याही प्रकारचे रोमँटिक नाते नव्हते. मीच तिला क्वचित भेटलोय, असे सांगत मी बऱ्याच काळात सेक्सही केला नसल्याचे मस्क यांनी खुलाशामध्ये म्हटले आहे. 
वॉल स्ट्रीट जर्नलने केलेल्या दाव्यानुसार मस्क यांचे निकोल शनहान हिच्यासोबत प्रेमसंबंध होते. यामुळे मस्क आणि सर्गेई यांची मैत्री तुटली आणि आता त्यांचा संसार तुटला आहे. डिसेंबरमध्येच याची ठिणगी पडल्याचे जवळच्या व्यक्तींच्या हवाल्याने दावा करण्यात आला आहे. 

मस्क यांनी हा दावा खोडताना, मी निकोलला गेल्या तीन वर्षांत फक्त दोनदाच पाहिलं आहे, ते सुद्धा जेव्हा बरेच लोक आमच्या आजूबाजूला होते, असे म्हटले आहे. वॉल स्ट्रीट जर्नलने यापूर्वी टेस्ला आणि माझ्याबद्दल बर्‍याच फालतू बातम्या लिहिल्या आहेत. आता मी ती मोजण्यासही विसरलो आहे, असे म्हटले आहे. 

Web Title: Elon Musk Rejects Allegations of Affair With Sergey Brin's Wife Nicole Shanahan after divorce Case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.