Twitter: ट्विटरमध्ये गळती सुरू; दोन मोठ्या अधिकाऱ्यांचा कंपनीला रामराम...

By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2022 11:37 AM2022-05-13T11:37:23+5:302022-05-13T11:38:16+5:30

Twitter: ट्विटरचे CEO पराग आग्रवाल यांनी अधिकाऱ्यांचा राजीनामा घेतला असून, नवीन भरतीदेखील थांबवली आहे.

Elon Musk| Twitter | Two big executives says goodbye to Twitter | Twitter: ट्विटरमध्ये गळती सुरू; दोन मोठ्या अधिकाऱ्यांचा कंपनीला रामराम...

Twitter: ट्विटरमध्ये गळती सुरू; दोन मोठ्या अधिकाऱ्यांचा कंपनीला रामराम...

googlenewsNext

Elon Musk Twitter: जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेल्या इलॉन मस्क (Elon Musk) यांनी मायक्रो ब्लॉगिंग साईट ट्विटर विकत घेतल्यानंतर कंपनीतील कर्मचाऱ्यांना त्यांच्या नोकऱ्यांची चिंता सतावत आहे. ट्विटरच्या डीलनंतर अनेकांना कल्पना होती की त्यांची नोकरी जाऊ शकते. पण, हे इतक्या लवकर होईल, याचा कोणालाही अंदाज नव्हता.

इलॉन मस्क आणि ट्विटरसोबतचा करार पूर्ण होण्याआधीच वरिष्ठ अधिकारी कंपनीतून बाहेर पडू लागले आहेत. Twitter चे ग्राहक उत्पादनांचे महाव्यवस्थापक(कंज्यूमर प्रोडक्ट्स जनरल मॅनेजर) केव्हॉन बेकपूर(Kayvon Beykpour) आणि महसूल महाव्यवस्थापक(रेव्हेन्यू जनरल मॅनेजर) ब्रुस फाल्क(Bruce Falck)  यांनी कंपनी सोडण्याची घोषणा केली आहे.

पराग अग्रवाल यांनी मागितला राजीनामा 
बेकपूर यांनी आपल्या राजीनाम्याची माहिती ट्विटरवरच दिली आहे. त्यांनी सांगितले की, 7 वर्षानंतर ते कंपनी सोडण्याचा निर्णय घेत आहेत. यासोबतच त्यांनी एक धक्कादायक खुलासाही केला आहे. बेकपूर म्हणाले की, त्यांना ट्विटरचे सीईओ पराग अग्रवाल यांनी कंपनी सोडण्यास सांगितले आहे. यावेळी त्यांनी ट्विटरचे सहसंस्थापक जॅक डोर्सी यांचे आभार मानले.

आता जबाबदारी कोण सांभाळणार
फाल्क गेली 5 वर्षे ट्विटरशी संबंधित होते. त्यांनी ट्विटरवर कंपनी सोडल्याची माहितीही दिली आहे. फाल्कने लिहिले की, गेल्या 5 वर्षांत ज्या टीम्स आणि भागीदारांसोबत मला काम करण्याची संधी मिळाली, त्या सर्वांचे मी आभार मानतो. या प्रकारचा व्यवसाय तयार करणे आणि चालवणे हे एक सांघिक कार्य आहे. दोन्ही अधिकाऱ्यांच्या राजीनाम्यानंतर जे सुलिव्हनचे उत्पादन आणि महसूल यांची जबाबदारी स्वीकारतील.

बाहेर काढण्याचे कारण काय?
द न्यूयॉर्क टाइम्सच्या वृत्तानुसार, ट्विटरच्या सीईओने फाल्क आणि बेकपूर यांच्या राजीनाम्याची माहिती अधिकृत मेलमध्ये दिली आहे. याच मेलमध्ये अग्रवाल यांनी नोकरभरती गोठवल्याची माहितीही दिली आहे. मात्र, कंपनीचा कोणालाही नोकरीवरून काढण्याचा कोणताही विचार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. कंपनीत पुढचा नंबर कोणाचा असेल याची माहिती सध्या तरी मिळालेली नाही. ब्लूमबर्गच्या वृत्तानुसार, दोन्ही अधिकाऱ्यांना त्यांचे टार्गेट पूर्ण न केल्यामुळे काढून टाकण्यात आले आहे.

Web Title: Elon Musk| Twitter | Two big executives says goodbye to Twitter

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.