294 कोटी रुपयांच्या आलिशान घरात राहणार इलॉन मस्कची 11 मुले, हजारो स्क्वेअर फूटची जागा...

By ऑनलाइन लोकमत | Published: October 30, 2024 05:49 PM2024-10-30T17:49:13+5:302024-10-30T17:49:43+5:30

इलॉन मस्क यांनी आपल्या कुटुंबासाठी एक आलिशान व्हिला खरेदी केला आहे.

Elon Musk's 11 children will live in a luxurious house worth Rs 294 crore, thousands of square feet of space | 294 कोटी रुपयांच्या आलिशान घरात राहणार इलॉन मस्कची 11 मुले, हजारो स्क्वेअर फूटची जागा...

294 कोटी रुपयांच्या आलिशान घरात राहणार इलॉन मस्कची 11 मुले, हजारो स्क्वेअर फूटची जागा...

Elon Musk : जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेले इलॉन मस्क (Elon Musk) त्यांच्या व्यावसायासह वैयक्तिक आयुष्यामुळेही अनेकदा चर्चेत असतात. आता पुन्हा एकदा ते आपल्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आले आहेत. फार कमी लोकांना माहित आहे की, इलॉन मस्क यांना 11 आपत्ये आहेत. मस्क यांना आपल्या सर्व 11 मुलांना एकाच घरात ठेवायचे आहे. यासाठी त्यांनी एक आलिशान घर खरेदी केले आहे. 

मीडिया रिपोर्ट्सनुसार, मस्क यांनी 14,400 स्क्वेअर फूटची हवेली खरेदी केली आहे. त्यांची 11 मुले या हवेलीत एकाच छताखाली राहतील. हे नवीन घर इलॉन मस्क यांच्या घरापासून 10 मिनिटांच्या अंतरावर आहे. घराजवळ असल्याने ते आपल्या मुलांसोबत वेळ घालवू शकणार आहे. या हवेलीची किंमत सुमारे 294 कोटी रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे. अमेरिकेतील टेक्सासमधील ऑस्टिन नावाच्या ठिकाणी मस्कने ही मालमत्ता खरेदी केली आहे.

इलॉन मस्क यांचे कुटुंब
इलॉन मस्क यांच्या पहिल्या पत्नीचे नाव जस्टिन मस्क असून, तिच्यापासून मस्क यांना सहा मुले झाली. त्यांचे पहिले मूल, नेवाडा बालपणातच मरण पावले. नंतर त्यांना आयव्हीएफद्वारे पाच मुले झाली. यामध्ये ग्रिफिन आणि व्हिव्हियन आणि सॅक्सन, डॅमियन आणि काई या तिघांचा समावेश आहे.दरम्यान, मस्क यांनी अभिनेत्री तालुलाह रिलेशी दोनदा लग्न केले आणि घटस्फोटही घेतला. मात्र, या नात्यात त्यांना मूल झाले नाही. यानंतर संगीतकार ग्रिम्ससोबत मस्क यांनी आणखी तीन मुलांना जन्म दिला. ग्रिम्सचे खरे नाव क्लेअर बाउचर आहे. मस्क आपल्या मुलांच्या ताब्याबाबत कायदेशीर लढाई लढत आहेत.

Web Title: Elon Musk's 11 children will live in a luxurious house worth Rs 294 crore, thousands of square feet of space

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.